video: रूपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करा;अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:22 IST2026-03-20T13:21:54+5:302026-03-20T13:22:18+5:30

फरार होण्याआधी कारवाई करा; चाकणकरांवर अंधारे यांचा गंभीर आरोप

pune news ashok Kharat Case rupali Chakankar Conduct narco test on Rupali Chakankar; Sushma Andhare makes serious allegations regarding Ashok Kharat case | video: रूपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करा;अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप

video: रूपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करा;अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप

पुणे : स्वयंघोषित ज्योतिषी आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर आरोप केले. अंधारे यांनी दावा केला की, आरोपी अशोक खरात यांच्या ट्रस्टशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा संबंध असल्याचे पुरावे त्यांच्या हाती आहेत.

  

माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी खालील मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली, रूपाली चाकणकर यांना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांची नार्को टेस्ट घेण्यात यावी.  दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करावी चौकशीपूर्वी चाकणकर यांना पदावरून बाजूला करावे.. त्या फरार होण्यापूर्वी कारवाई व्हावी त्या पुढे म्हणाल्या,  चाकणकर आणि खरात यांचे CDR (Call Detail Records) तपासावेत.  या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीनेही तपास करावा दोघांच्या संपत्तीचे स्त्रोत तपासावेत, विशेषतः खरात यांची देश-विदेशातील मालमत्तेची चौकशी व्हावी.  
 
पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना अंधारे यांनी आरोपही केला की,रूपाली चाकणकर या त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून तपासावर परिणाम करू शकतात.  तसेच, त्या सध्या कुठे आहेत याबाबतही शंका उपस्थित करत त्यांनी त्या महाराष्ट्रात आहेत की बाहेर, याची चौकशी करण्याची मागणी केली. अंधारे यांनी स्पष्ट केले की,या प्रकरणात कुणीही दोषी असेल, तो आमच्या पक्षाचा असला तरी कारवाई व्हावी. त्यांनी जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांची नावे घेतली, मात्र त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचेही सांगितले.

Web Title : रूपाली चाकणकर का नार्को टेस्ट; अशोक खरात पर सुषमा अंधारे के गंभीर आरोप

Web Summary : सुषमा अंधारे ने रूपाली चाकणकर के नार्को टेस्ट और गिरफ्तारी की मांग की, आरोपी अशोक खरात से कथित संबंधों के कारण। उन्होंने वित्तीय संपत्तियों और मामले पर संभावित प्रभाव की जांच का आग्रह किया, चाहे पार्टी कोई भी हो।

Web Title : Narco test Ruapli Chakankar; Sushma Andhare serious allegations on Ashok Kharat

Web Summary : Sushma Andhare demands Rupali Chakankar's narco test and arrest due to alleged ties with accused Ashok Kharat. She urges investigation into financial assets and potential influence on the case, regardless of party affiliation.