शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा बुरखा उच्च न्यायालयात फाटला : रुपाली चाकणकरांचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 16:54 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.त्यात त्यांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे.

धायरी : पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. पुण्याचे महापौर मात्र खोट्या आकडेवारीची धूळफेक करण्यात व्यस्त आहेत. माहितीच्या अभावी होणारी रुग्णांची फरफट थांबवण्यासाठी महापालिकेने डॅशबोर्डवर माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. प्रत्यक्षात मात्र महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर चुकीची माहिती उपलब्ध असल्याचं निदर्शनास आलं आहे. प्रत्यक्षात कुठेही बेड उपलब्ध नसताना डॅशबोर्डवर अनेक बेड्स उपलब्ध असल्याचे पुणे महानगरपालिकेतर्फे दाखवण्यात आले पुणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा हा बुरखा काल मुंबईत उच्च न्यायालयात फाटला अशा शब्दात राष्ट्रवादीच्या काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे महापालिकेच्या सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. पुणे महानगरपालिकेची ही लबाडी उच्च न्यायालयात उघडकीस आल्याने सर्व पुणेकरांची मान शरमेने खाली गेली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या कोविड हेल्पलाईनने कॉलर ट्यून म्हणून 'बेड उपलब्ध नाहीत, आत्मनिर्भर व्हा' हे वाक्य ठेवलं पाहिजे, असा उपरोधात्मक टोला देखील लगावला आहे. 

काय आहे प्रकरण...कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बर्‍याच लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच, बर्‍याच रुग्णांचा ऑक्सिजन अभावी अथवा व्हेंटिलेटर बेड अभावी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. महाराष्ट्रात पुण्यासारख्या प्रगतशील शहरात व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील परिस्थिती तितकीशी सक्षम झालेले अजूनही दिसत नाही आहे. याच मुद्द्यावर लक्ष देत मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला खडे बोल सुनावले आहे.

पुण्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी बेड्स उपलब्धतेबाबत या विषयाला घेवून बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र याची दखल आज मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. कोर्टाने म्हटले आहे की, ‘केवळ डॅशबोर्ड तयार करणे पुरेसे नाही तर बेडसुद्धा उपलब्ध असावेत.’ अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालनने पुणे महानगर पालिकेला फटकारले आहे. मात्र शहरात ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला आहे. वेळीच रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण ही तुमची जबाबदारी आहे, अशा शब्दात उच्च न्यायालयाने पुणे महानगर पालिकेची कानउघडणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिलाPoliticsराजकारणBJPभाजपाHigh Courtउच्च न्यायालयMayorमहापौर