नागरिकांकडून पाण्याचे पैसे मागितल्यास ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा टँकर चालकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:47 IST2026-03-28T14:46:14+5:302026-03-28T14:47:20+5:30

नागरिकांकडे टँकरचालकांनी पैसे मागितल्यास पाणीपुरवठा विभागाकडे ९६८९९००००२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पुराव्यांसह फोटो पाठवावा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे

Pune Municipal Corporation warns tanker drivers of Rs 5,000 fine if citizens ask for water | नागरिकांकडून पाण्याचे पैसे मागितल्यास ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा टँकर चालकांना इशारा

नागरिकांकडून पाण्याचे पैसे मागितल्यास ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा टँकर चालकांना इशारा

पुणे : महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी टँकर चालकाने किंवा मालकाने नागरिकांकडून पैसे घेतल्यास किंवा पैशांची मागणी केल्यास संबंधितांवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिला आहे.

महापालिकेच्या वतीने शहराच्या काही भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. मात्र, टँकरचालक, मालक संधीचा फायदा घेत नागरिकांकडे पाण्याच्या टँकरसाठी पैशांची मागणी करतात. काही नागरिक गरजेपोटी पैसेही देतात. मात्र, अनेक ठिकाणी यामधून वाददेखील होतात. यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग सजग झाला आहे. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप यांनी टँकरचालक अथवा मालकांनी पैशाची मागणी करू नये. नागरिकांनीही त्यांच्या मागणीस भरीस पडू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांकडे टँकरचालक अथवा मालकांनी पैसे मागितल्यास पाणीपुरवठा विभागाकडे ९६८९९००००२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पुराव्यांसह फोटो पाठवावा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

महापालिकेच्या वतीने दिले जाणारे टँकर हे मोफत असतात. त्यासाठी महापालिका कोणतेही शुल्क घेत नाही. टँकरचालकांनी नागरिकांकडून शुल्क घेऊ नये. जे टँकरचालक, मालक पाण्याच्या टँकरसाठी नागरिकांकडून बेकायदा पद्धतीने पैसे घेतील, त्यांच्यावर पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली जाईल. - नंदकुमार जगताप, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका

Web Title : पुणे: पानी के पैसे मांगने पर टैंकर चालकों पर ₹5000 का जुर्माना

Web Summary : पुणे महानगरपालिका ने टैंकर चालकों को चेतावनी दी है: पानी के लिए पैसे मांगने पर ₹5000 का जुर्माना लगेगा। नागरिकों को ऐसे मामलों की सबूत के साथ रिपोर्ट करने का आग्रह किया गया है।

Web Title : Pune: ₹5000 Fine for Tanker Drivers Demanding Water Money

Web Summary : Pune Municipal Corporation warns tanker drivers: demanding money for water will result in a ₹5000 fine. Citizens are urged to report such incidents with evidence.