पुणे : महापालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.१९) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कृषल कसबे (वय ४२, रा. गंज पेठ) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. कृषल यांचा मृतदेह डेक्कन परिसरातील नदीपात्रातील मोकळ्या जागेत आढळून आला. त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिस अंमलदार आकाश बाळासाहेब सोनवणे (वय ३२, रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, पोलिसांना या प्रकरणी दोघांवर संशय असून, पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे डेक्कन परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातून किंवा वैयक्तिक कारणातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच, संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : A Pune Municipal Corporation security guard, Krushal Kasbe, was found murdered near the river in Deccan. Police suspect personal enmity as the motive and are searching for two suspects. Investigations are ongoing, with police reviewing CCTV footage and forming special teams.
Web Summary : पुणे नगर निगम के सुरक्षा गार्ड कृशल कसबे की डेक्कन में नदी के पास हत्या कर दी गई। पुलिस को निजी दुश्मनी का संदेह है और दो संदिग्धों की तलाश जारी है। पुलिस सीसीटीवी फुटेज की समीक्षा कर रही है और विशेष टीमें बना रही है।