पुणे : स्वारगेट-कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम करण्यास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन २९ सप्टेंबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. पण, या मार्गावर मेट्रो स्टेशन वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी केली होती. त्याला राज्य सरकारनेदेखील परवानगी दिली.
मूळ आराखड्यात बदल करून तीनऐवजी पाच मेट्रो स्टेशन करण्यास परवानगी मिळाली. पण, या काळात मेट्रो मार्गाचे काम सुरू होण्यास वेळ गेला. महामेट्रोकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
यामध्ये अदानी समूहाच्या आयटीडी सिमेंटेशन कंपनीची कमी रकमेची निविदा आल्यामुळे त्यांना हे काम मिळाले होते. प्रशासकीय कामाचा भाग म्हणून या कामास सुरुवात करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागविण्यात आली होती. त्याला नुकतीच निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यानुसार संबंधित कंपनीला काम करण्याची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
Web Summary : The Swargate-Katraj underground metro project is set to commence soon. Election Commission's approval paves the way after delays due to station modifications and tendering. Adani Group's ITD Cementation secured the contract, with work orders now issued.
Web Summary : स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो परियोजना जल्द ही शुरू होने वाली है। चुनाव आयोग की मंजूरी के बाद स्टेशन संशोधन और निविदा में देरी हुई। अडानी समूह की आईटीडी सीमेंटेशन को अनुबंध मिला, अब कार्य आदेश जारी किए गए हैं।