शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

Pune Metro: अखेर शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो जुलैमध्ये धावणार; एकूण २३ किमीची टप्पा गाठणार, ट्राफिकही कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:04 IST

हिंजवडी ते बालेवाडी फाटा १२ किमीचा पहिला टप्पा मे मध्ये तर बालेवाडी फाटा ते शिवाजीनगर हा ११ किमी मार्ग जुलैमध्ये सुरू

पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडीमेट्रो प्रकल्पातील २३ किमींपैकी हिंजवडी ते बालेवाडी फाटा हा १२ किलोमीटरचा मार्ग मे महिन्यात सुरू होणार आहे तर उर्वरित बालेवाडी फाटा ते शिवाजीनगर हा ११ किलोमीटरचा मेट्रो मार्ग जुलैमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मेट्रो भवनच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी ते बोलत होते. यामुळे आता शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो जुलैमध्ये धावणार असल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी पीपीपी तत्त्वावर ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ या कंपनीला हे काम दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चअखेरपर्यंत हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, अनेक मेट्रो स्थानकांची कामे मोठ्या प्रमाणात शिल्लक होती. शिवाय हा संपूर्ण मार्ग एकाच टप्प्यात सुरू करणार होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सूचना दिल्या होत्या. परंतु, या मार्गावरील अनेक मेट्रो स्थानकांची कामे अजून सुरू आहेत. शिवाय काही ठिकाणी अर्धवट कामे आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचा मुहूर्त हुकला आहे. दुसरीकडे अनेक मेट्रो स्थानकांचे प्रवासी जिने व लिफ्ट जोडण्याचे काम सुरू आहे. या कामाला आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही महिने तरी कोंडीतच प्रवास करावा लागणार आहे.

प्रवासी त्रस्त 

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग आयटीयन्सना सोयीचे ठरणार आहे. यामुळे हा मार्ग कधी सुरू होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु, हा मेट्रो मार्ग सुरू होण्यास आता तीन वेळा मुहूर्त हुकला आहे. याचा फटका वाहनधारक आणि कर्मचाऱ्यांना बसत आहे. पहिल्या टप्प्यात मे महिन्यात केवळ १२ किमी मार्गावर मेट्रो सुरू होणार आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला तरी पूर्ण मार्ग सुरू झाल्यावरच या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

प्रमुख भागांत ‘टनेल नेटवर्क’ 

मेट्रोसह आम्ही ‘मल्टी-मोडल’ ट्रान्सपोर्टेशनवर भर देत आहोत. मेट्रोसोबत बस सेवांचे एकत्रीकरण करण्यात येत असून, पुण्यातील प्रमुख भागांत ‘टनेल नेटवर्क’ (बोगद्यांचे जाळे) उभारण्यात येणार आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे पुण्याच्या वाहतुकीच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघेल. पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आम्हाला हक्काचे घर मिळाले : श्रावण हर्डीकर

सन २०१६ मध्ये मेट्रोचे काम सुरू झाले. परंतु, गेल्या १० वर्षांत कामासाठी मेट्रो कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणे बदलावी लागली. आज मेट्रो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. त्यांच्यासाठी हक्काच घर म्हणजे मेट्रो भवनचे उद्घाटन झाले. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रो फायद्याची आणि सुरक्षित ठरत आहे, असे श्रावण हर्डीकर म्हणाले.

मेट्रो भवन : ठळक वैशिष्ट्ये 

- एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,१५० चौ. मीटर
- भव्य स्वागत कक्ष व पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी कला स्थापना.
- अनुभव केंद्रात पुणे मेट्रोचे जाळे व प्रकल्पाची मॉडेल्स.
- ३१२ आसनक्षमतेचे सभागृह व बॅकअप संचालन नियंत्रण केंद्र, सिग्नलिंग व दूरसंचार सुविधा.
- काच दर्शनी भागामुळे नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणपूरक रचना.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Metro: Shivajinagar-Hinjewadi line to run in July, easing traffic.

Web Summary : The Shivajinagar-Hinjewadi metro will partially open in May, with the full 23km route operational by July. This is expected to ease traffic congestion. The project faced delays but is now progressing rapidly, promising relief for commuters. A 'tunnel network' will further improve transportation.
टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीMetroमेट्रोpassengerप्रवासीTrafficवाहतूक कोंडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार