Pune Mayor: तारीख ठरली! पुढील आठवड्यात महापौर मिळणार; कोण भूषवणार पुण्याचे ५८ वे महापौरपद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:54 IST2026-01-23T12:53:58+5:302026-01-23T12:54:52+5:30

Pune Mayor सध्या भाजपमधून वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, स्वरदा बापट आणि रंजना टिळेकर ही नावे महापौरपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत

Pune Mayor The date has been set! The mayor will be elected next week; Who will be the 58th mayor of Pune? | Pune Mayor: तारीख ठरली! पुढील आठवड्यात महापौर मिळणार; कोण भूषवणार पुण्याचे ५८ वे महापौरपद?

Pune Mayor: तारीख ठरली! पुढील आठवड्यात महापौर मिळणार; कोण भूषवणार पुण्याचे ५८ वे महापौरपद?

पुणे: पुणे महापलिकेत भाजपने तब्बल ११९ जागा मिळवून सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामध्ये सर्वधिक महिला नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेचे आरक्षण महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. पुणे महापालिकेवर महिलाराज असणार आहे. अशातच महापौरपदाबाबत तारीख ठरल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी शेवटच्या आठवड्यात ३० आणि ३१ तारखेला महापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम होणार आहे. १ फेब्रुवारीपासून पुण्याला महापौर मिळणार आहे. पुणे महापालिकेचे ५८ वे महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची एकहात्ती सत्ता आली आहे. त्यानंतर महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महापौरपद महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. आता महापौरपदाची निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. विभागीय आयुक्त या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभा सात दिवसांत घेण्याची नोटीस काढली जाते. महापौरपदाची निवडणूक होणार त्या दिवशी सभा सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत दिली जाते. त्यानंतर महापौरपदासाठी मतदान घेतले जाते. संबंधित पीठासीन अधिकारी महापौरपदी निवडून आलेल्या व्यक्तीची घोषणा करतात. महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया करण्यासाठी पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर सात दिवसांची मुदत देऊन सभा बोलवावी लागते. 

ही नावे महापौरपदासाठी संभाव्य उमेदवार 

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडेच जाणार, याबाबत फारशी शंका नव्हती. मात्र, आरक्षण जाहीर न झाल्याने महापौरपदासाठीच्या नावावर चर्चा रखडली होती. अखेर मुंबईतील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत पार पडली. या सोडतीत पुणे महापालिकेसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर होताच भाजपमधील महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. सध्या भाजपमधून वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, स्वरदा बापट आणि रंजना टिळेकर ही नावे महापौरपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. पक्ष नेतृत्वाकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title : पुणे को अगले सप्ताह मिलेगा नया महापौर; चुनाव की तारीख तय!

Web Summary : पुणे को अगले सप्ताह अपना 58वां महापौर मिलेगा क्योंकि भाजपा के पास बहुमत है। महापौर का चुनाव 30 और 31 जनवरी को होना है। भाजपा की कई महिला पार्षद संभावित उम्मीदवार हैं।

Web Title : Pune to get new mayor next week; election date confirmed!

Web Summary : Pune will get its 58th mayor next week as BJP holds a majority. The mayoral election is scheduled for January 30th and 31st. Several BJP women corporators are potential candidates.