कात्रज - कात्रजच्या जुन्या घाटात गुरुवारी सायंकाळी एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.अधिकच्या माहितीनुसार, स्वारगेटहून सांगली-विटा दिशेने जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस आणि खेड शिवापूरहून कात्रजकडे येणारी रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाली.
धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच, रिक्षातील अन्य तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झीने घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Web Summary : A fatal accident occurred in Katraj Ghat involving a state transport bus and a rickshaw. The rickshaw driver died on the spot, and three passengers were critically injured. Police are investigating the incident, which caused significant damage to the rickshaw.
Web Summary : कात्रज घाट में राज्य परिवहन की बस और रिक्शा की टक्कर में एक दर्दनाक हादसा हुआ। रिक्शा चालक की मौके पर ही मौत हो गई, और तीन यात्री गंभीर रूप से घायल हो गए। पुलिस मामले की जांच कर रही है। रिक्शा बुरी तरह क्षतिग्रस्त हो गया।