Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:00 IST2025-11-20T17:46:58+5:302025-11-20T18:00:13+5:30
Pune Crime News: पुण्यातील बालेवाडी परिसरात हिट अँड रनची घटना घडली. टेम्पोने दिलेल्या धडकेत सात वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला, तर अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला.

Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
Pune News: पुण्यात हिट अँड रनची भयंकर घटना घडली. आजोबा आणि छोट्या भावासोबत जात असलेल्या एका सात वर्षाच्या मुलाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली. अनुराग चांदमारे असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या घटनेत आजोबा आणि पाच वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे.
अनुराग हा त्याचे आजोबा बंडू वावळकर आणि भाऊ अभिनव चांदमारे यांच्यासोबत जात होता. त्याचवेळी टेम्पोने तिघांना उडवले. यात सात वर्षाच्या अनुरागचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाच वर्षाचा अभिनव आणि आजोबा बंडू वावळकर हे जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
धडक देऊन फरार झालेल्या टेम्पो चालकाचा बावधन पोलीस सध्या शोध घेत आहेत. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
हिंजवडीत २० वर्षाचा डम्परखाली मृत्यू
दोन दिवसापूर्वीच एका २० वर्षीय तरुणीला डम्परने चिरडल्याची घटना घडली घडली होती. हिंजवडी आयटी पार्कमध्ये तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०) ही तरुणी वडिलांसोबत दुचाकीवरुन जात होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या डम्परने दुचाकीला जोरात धडक दिली.
धडकेनंतर तन्वी खाली पडली आणि डम्परच्या चाकाखाली चिरडली गेली. या घटनेत तिचे वडील जखमी झाला. या घटनेला काही दिवस उलटतच नाही, तोच आता बालेवाडीत टेम्पोने चिरडल्याची घटना घडली आहे.