शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Heavy Rains: पुण्याच्या रस्त्यांवर अवकाळीच्या लाटा..! शहरातील रस्ते जलमय, अनेक ठिकाणी पाणी शिरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:32 IST

Pune Unseasonal Heavy Rain: चेंबर तुंबले, झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी

पुणे : शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह पुणेकरांची दाणादाण उडवली. तासाभराच्या तुफानी पावसाने पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले. जणूकाही समुद्राच्या लाटाच उसळत आहेत, अशीच स्थिती रस्त्यांवर पहायला मिळाली.

त्या पाण्यात अनेक वाहने अडकून पडली. दरम्यान, शहराच्या विविध भागात पाणी शिरले आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. शहरात अनेक ठिकाणचे चेंबर आणि पावसाळी लाइन तुंबल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, झाड पडल्याने सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती येथे एका फूल विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला.गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडत आहे. मागील आठवडाभरापासून शहर व परिसरातील कमाल तापमान चाळिशी गाठत आहे. ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसभर ऊन आणि रात्री हलकासा गारवा असे वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी मात्र सकाळपासून उन्हाचा चटका असताना दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यानंतर मंगळवारी विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला.

यानंतर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. जवळपास दीड ते दोन तास कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातच पावसाळी लाइन आणि चेंबर तुंबल्याने रस्त्याच्या लगतची दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. पावसासह सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या.रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी आणि पडलेले झाड आणि फांद्यांमध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिवाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची आणि दुचाकीस्वारांची चांगलीच दाणादाण व तारांबळ उडाली.पावसाळी कामांसाठी आठवडाभरात निविदा -महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे, नाले, पावसाळी गटारे, चेंबर आदींची साफसफाई करून राडारोडा उचलण्याची कामे केली जातात. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण केले जाते. ही कामे दरवर्षी एप्रिलमध्ये सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातात. तसेच विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करण्यास परवानगी दिलेल्या संस्थांनी १ मेपासून खोदाई बंद करून ३१ मेपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याचे बंधन घालण्यात येते. त्यामुळे अद्याप महापालिकेने पावसाळी कामांच्या निविदा काढलेल्या नाहीत. त्यामुळे अद्याप पावसाळी लाइन, ओढे आणि नाल्यांची साफसफाई झालेली नाही. त्यामुळे गुरुवारी झालेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचल्याचे पहायला मिळाले. यासंदर्भात महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पावसाळी कामांच्या निविदा आठवडाभरात काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.अवकाळी पावसामुळे पुणेकर अंधारातशहर व परिसरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे आणि वादळामुळे अनेक अति उच्चदाब व उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने पुणे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. महावितरणचे वीज कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर परिश्रम घेत आहेत. अनेक भागांचा बाधित झालेला वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरूदेखील करण्यात आला आहे. काही भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.पुण्यातील पाऊस (मिमी) :खडकवासला १०७कात्रज ८६एनडीए : ८४डेक्कन ८२वारजे ८०शिवाजीनगर ६५हडपसर : ४२.५ पाषाण ३६.३दापोडी २९चिंचवड २८.५माळीण १८.५डुडुळगाव १३.५नारायणगाव १२तळेगाव ६.५ राजगुरूनगर ४.५शिरूर २बालेवाडी १

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Hit by Unexpected Rain, Roads Flooded, Life Disrupted

Web Summary : Torrential rains lashed Pune, flooding roads and disrupting life. Vehicles were stranded, trees uprooted, and power outages occurred. A flower vendor died due to a falling tree. The municipal corporation promises swift action on drainage cleaning.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेRainपाऊसWaterपाणीweatherहवामान अंदाज