Pune Ganpati Festival : गणेशोत्सवात चार दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:25 IST2025-08-28T10:25:14+5:302025-08-28T10:25:47+5:30

या आदेशानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत.

Pune Ganpati Festival Liquor shops closed for four days during Ganeshotsav | Pune Ganpati Festival : गणेशोत्सवात चार दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद

Pune Ganpati Festival : गणेशोत्सवात चार दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद

पुणे : शहराच्या मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने गणेशोत्सवात दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश काढले आहेत. या आदेशानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत.

याला शहरातील बार अँड रेस्टोरंट चालक संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेची सुनावणी मंगळवारी झाली. त्यामध्ये मद्य विक्री दुकाने बंदच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. त्यानुसार आता गणेशोत्सवात मध्य भागात मोठ्या संख्येने भाविक येतात. उत्सवाच्या कालावधीत घडणारे गैरप्रकार, वाद, तसेच भांडणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहराच्या मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता.

या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. त्यानुसार गेल्या वर्षी उत्सवाच्या काळात संपूर्ण दहा दिवस खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने (बार अँड रेस्टोरंट, वाईन शॉप) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यावर्षीही मध्य भागातील मद्य विक्री दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या निर्णयास बार अँड रेस्टोरंट संघटना आणि मद्य विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Web Title: Pune Ganpati Festival Liquor shops closed for four days during Ganeshotsav