शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: प्रेम संबंध, फसवणूक, बॅटने मारहाण ..; सेक्रेटरीचा भाजप पदाधिकाऱ्यासह पत्नी अन् लेकीने असा काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:52 IST

Pune Crime - पाेत्यात मृतदेह ठेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

पुणे :  अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागात घडली. या प्रकरणी एका वकिलासह त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पूनम दिनेश मुन (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वकील ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनमचे पती दिनेश यांनी फिर्याद दिली असून, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली.ॲड. सावंत यांचे पूनमशी प्रेमसंबंध होते. ॲड. सावंत यांचे चंदननगर भागातील जुन्या मुंढवा रस्त्यावर कार्यालय आहे. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होती. गुरुवारी (दि. १६) सकाळी ती नेहमीप्रमाणे ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेली. त्यानंतर ॲड. सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीने तिला बॅटने मारहाण केली.तिच्यावर शस्त्राने वार करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात ठेवण्यात आला. रात्री आठपर्यंत पूनम घरी न परतल्याने तिच्या पतीने ॲड. सावंत यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पूनम मैत्रिणीकडे गेल्याचे सांगण्यात आले. पतीने तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला; मात्र मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पूनमचे पती शुक्रवारी सकाळी ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा मृतदेह तेथेच ठेवण्यात आला होता. त्यानंतर पूनमच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार, तसेच पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.चंदननगर पोलिसांनी ॲड. सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तसेच गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती हिला ताब्यात घेतले. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहा तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. पोलीस निरीक्षक बडाख, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Affair, Deceit, Murder! Secretary Killed by Lawyer, Wife, Daughter

Web Summary : In Pune, a woman was murdered over an affair. A lawyer, his wife, and daughter are arrested for beating her to death at his office. The victim worked as his assistant. Police quickly solved the case.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र