राजगुरुनगर : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पतीकडून वारंवार करण्यात येणारी मारहाण आणि सतत होत असलेल्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने तिच्या लहान मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संजीवनी लक्ष्मण कुमटकर (वय ३५, रा.राजगुरुनगर, ता.खेड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत पती लक्ष्मण अश्रुबा कुमटकर (रा.राजगुरुनगर, ता.खेड, मूळ रा.राजेवाडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विवाहितेला दोन मुली होत्या. तुला मुलगा होत नाही, या कारणावरून पती लक्ष्मण कुमटकर याने वारंवार शिवीगाळ, दमबाजी आणि हाताने मारहाण करून विवाहितेचे जीवन जगणे कठीण केले होते.
सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राक्षेवाडी (ता.खेड) गावातील हृदयातील विहिरीत उडी मारून तिची लहान मुली(वय ६)सहीत आत्महत्या केली. याबाबत विवाहितेचे वडील अशोक अंबादास भोसले (रा.खांडवी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर) यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Web Summary : Rajgurunagar: Harassed for not bearing a son, a woman killed herself and her six-year-old daughter by jumping into a well. The husband has been charged with abuse and abetment to suicide.
Web Summary : राजगुरुनगर: बेटा पैदा न होने पर पति द्वारा प्रताड़ित किए जाने से तंग आकर एक महिला ने अपनी छह वर्षीय बेटी के साथ कुएं में कूदकर आत्महत्या कर ली। पति पर प्रताड़ना और आत्महत्या के लिए उकसाने का आरोप लगा है।