पुणे: उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने अनेकांनी शहराबाहेर फिरायला जाण्याचे बेत आखले आहेत. हीच संधी साधण्यासाठी चोरदेखील सक्रिय झाले आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरांनी ११ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह एका मिठाई दुकानात चोरांनी डल्ला मारून ७० हजार ५०० रुपये अशाप्रकारे तीन घटनांमध्ये १२ लाख २० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
पहिल्या घटनेत, वडगावशेरी येथील नवरत्न सोसायटी येथील एका फ्लॅटमध्ये चोरांनी १९ लाख ९७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ ते ३१ मार्च या कालावधीत घडली. या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जगदाळे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, हडपसर येथील संत ज्ञानेश्वर कॉलनी, गल्ली नं. ७ येथील एका घरातून चोरांनी ५० हजार ५०० रुपये किमतीचे मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. घरात शिरण्यासाठी चोरांनी घराच्या फुटलेल्या खिडकीचा वापर केला. ही घटना ३१ मार्च रोजी घडली. या प्रकरणी ४२ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून काळेपडळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राऊत करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, बिबवेवाडी येथील एका मिठाई दुकानाचे शटर उचकटून चोरांनी मोबाईल, रोख रक्कम आणि केसर डबा असा ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी ६४ वर्षीय दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून बिबवेवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.३० मार्च रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.
Web Summary : Pune sees a spike in burglaries during summer vacations. Thieves targeted three locations, including a flat and a sweet shop, stealing valuables worth ₹12.2 lakhs. Police are investigating the incidents, which occurred in Wadgaon Sheri, Hadapsar and Bibwewadi.
Web Summary : पुणे में गर्मी की छुट्टियों में चोरी की वारदातें बढ़ीं। चोरों ने एक फ्लैट और मिठाई की दुकान सहित तीन जगहों को निशाना बनाया और ₹12.2 लाख का माल चुरा लिया। पुलिस मामलों की जांच कर रही है, जो वाडगांव शेरी, हडपसर और बिबवेवाड़ी में हुए।