Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 14:19 IST2025-10-12T14:15:49+5:302025-10-12T14:19:23+5:30
Pune Crime: ते सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण, गेल्या काही दिवसापासून त्याला तिच्याबद्दल संशय येत होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती त्याच्यासोबत लॉजवर गेली आणि घडलेल्या हत्याकांडाने पुणे हादरले.

Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
Pune Crime News: २६ वर्षांची प्रेयसी आणि २५ वर्षाचा प्रियकर. मागील सहा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. ती डी-मार्टमध्ये काम करायची तर हॉटेल व्यवसायात होता. इन्स्टाग्रामवर ते भेटले आणि त्यानंतर प्रेमात पडले. पण, सहा वर्षानंतर त्यांच्या प्रेमाच भयंकर शेवट झाला. तिचा वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरा करण्यासाठी तो तिला वाकडमधील एका लॉजवर घेऊन गेला. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ते लॉजमधील खोलीत होते. त्याचवेळी बऱ्याच काळापासून त्यांच्या मनात असलेली शंका त्याने बोलवून दाखवली. त्यांच्यात वाद झाला आणि त्याने तिचा मोबाईल बघितला. तिचे दुसऱ्या पुरुषासोबत नग्न फोटो तिच्या मोबाईलमध्ये होते. ते पाहून तो भडकला आणि केक कापलेल्या चाकूनेच तिच्यावर वार केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. मेरी मल्लेश तेलगु (वय २६, रा. देहूरोड) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तर दिलावर सिंग (वय २५, रा. पिसोळी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
मेरी आणि दिलावर इन्स्टाग्रामवर भेटले अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरी तेलगु ही डी-मार्टमध्ये कामाला होती. दिलावर सिंगसोबत तिचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. इन्स्टाग्रामवर त्यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्याच बोलणं सुरू झालं. भेटी झाल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
मेरीचा वाढदिवस, लॉजमधील रुममध्ये सेलीब्रेशन
मयत मेरीचा १० ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. दिलावर सिंग ११ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला वाकडमधील एका लॉजवर घेऊन गेला. काळाखडक परिसरातील लॉजमधील रुममध्ये ते होते. तिथे केक कापला. वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांच्यात बोलणं सुरू झालं.
दिलावरने गर्लफ्रेंडसमोर तुझे दुसऱ्यासोबत संबंध असल्याचा संशय असल्याचा विषय काढला. त्यातून त्यांच्यात वाद सुरू झाला. दिलावरने तिचा मोबाईल घेतला आणि बघितला. मोबाईलमध्ये गर्लफ्रेंडचे दुसऱ्या माणसासोबतचे अश्लील फोटो त्याला दिसले.
केक कापायच्या चाकूनेच केले वार
मेरीचे दुसऱ्या पुरुषासोबत नको त्या अवस्थेत असलेले फोटो बघून दिलावर सिंग भडकला. त्याने केक कापलेल्या चाकूनेच मेरीवर वार केले. सोबत आणलेल्या लोखंडी पानानेही त्याने तिला जखमी केले. मेरीची हत्या केल्यानंतर दिलावर कोंढवा पोलीस ठाण्यात गेला.
मेरीचा लॉजमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता मृतदेह
गर्लफ्रेंडचा खून केल्याचे त्याने पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर वाकड पोलिसही त्या लॉजवर गेले. तिथे मेरीचा खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलावरला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला.