Video : भिगवण केस ट्विस्ट; न्यायालयात मुलीची आई-मामाकडे जाण्याची इच्छा; कोर्टात नेमकं काय घडलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:58 IST2026-02-25T18:51:20+5:302026-02-25T18:58:42+5:30

तुला कोणासोबत राहायचे आहे?” यावर तिने कोणतीही दबाव नसल्याचे सांगत आई व मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

pune crime news video New twist in Bhigwan kidnapping case; Girl's desire to go to her mother and uncle in court; What exactly happened in court? | Video : भिगवण केस ट्विस्ट; न्यायालयात मुलीची आई-मामाकडे जाण्याची इच्छा; कोर्टात नेमकं काय घडलं ?

Video : भिगवण केस ट्विस्ट; न्यायालयात मुलीची आई-मामाकडे जाण्याची इच्छा; कोर्टात नेमकं काय घडलं ?

भिगवण  - भिगवण येथील गाजलेल्या कथित अपहरण प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली. संबंधित तरुणीने इंदापूरन्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहून आई व मामाकडे जाण्याची स्पष्ट इच्छा व्यक्त केली. तिच्या या जबाबामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुलगी मागील पाच दिवसांपासून सुधारगृहात होती. आज इंदापूरन्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी तिला थेट विचारणा केली की, “तुला कोणासोबत राहायचे आहे?” यावर तिने कोणतीही दबाव नसल्याचे सांगत आई व मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. आनंद देशपांडे यांनी वकीलपत्र दाखल केले होते. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६/२०२६ संदर्भात आजची सुनावणी महत्त्वाची ठरली. न्यायालयाने मुलीची संमती नोंदवून तिच्या इच्छेनुसार पुढील प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाचा अधिकृत आदेश सुधारगृह प्रशासनाकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर संबंधित तरुणीला आई व मामाच्या ताब्यात देण्याची कार्यवाही होणार आहे.


 
तत्पूर्वी,  या प्रकरणात संबंधित तरुण व तरुणी काही दिवसांपूर्वी बारामती शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाले होते. त्यावेळी तरुणीने “मी माझ्या मर्जीने गेले,” असे स्पष्ट केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. दोघांचे जबाब नोंदवून चौकशी सुरू करण्यात आली होती.
 
मुलीने पूर्वी आई व भावाकडे जाण्यास नकार दिल्याची नोंद असून महिलागृहात ठेवण्याचाही पर्याय विचाराधीन होता. मात्र आजच्या जबाबामुळे तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोपीला सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात स्थळी हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर मुलीच्या ताब्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. भिगवण परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : भिगवन मामला: अदालत में लड़की ने माँ को चुना, आया नया मोड़।

Web Summary : भिगवन मामले में नया मोड़ आया है क्योंकि लड़की ने वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से इंदापूर अदालत के सामने अपनी माँ और चाचा के साथ रहने की इच्छा व्यक्त की। अदालत सुधार गृह को आदेश भेजेगी। आरोपी को अज्ञात स्थान पर ले जाया गया है।

Web Title : Bhigaon Case: Twist as Girl Chooses Mother in Court.

Web Summary : The Bhigwan case took a turn as the girl expressed her wish to live with her mother and uncle before the Indapur court via video conference. The court will send the order to the rehabilitation center. The accused has been moved to an undisclosed location.