शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमध्ये गोव्याची बेकायदेशीर दारू पकडली, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:41 IST

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक आणि दौंड उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई आज दुपारी करण्यात आली.

दौंड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत दौंड येथे गोवा राज्यातून बेकायदेशीरपणे वाहतूक होत असलेला दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल दीड कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, युसुफ शेख या आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती दौंड उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय रोकडे आणि दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक आणि दौंड उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दौंड येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ सापळा रचण्यात आला. गोवा राज्यातील बनावट गोवा ब्रँडची विदेशी दारू सहा चाकी लेलँड कंपनीच्या ट्रकमधून (क्र. एम.एच. १८ बी. जी. २३०४) वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

छापा टाकून संबंधित ट्रकची झडती घेतली असता, त्यामध्ये ११ हजार दारूचे बॉक्स आढळून आले. दारूचा साठा व ट्रक असा एकूण दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उपअधीक्षक रवींद्र उगले, रियाज खान आणि विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. आर. गायकवाड , एस. एस. गोंदकर, बाबू देवकर, अमोल चौगुले, महेश कोकणे, चंदन पंडित तसेच दौंड विभागाचे निरीक्षक विजय रोकडे व दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक सहभागी होते.

या प्रकरणात मोठ्या प्रमाणात परराज्यातील मद्यसाठा जप्त करण्यात आल्याने महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची शक्यता असून, संबंधित इतर आरोपींचा तपास सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Daund: Illegal Goan Liquor Seized; Goods Worth ₹1.5 Crore Confiscated

Web Summary : Authorities in Daund seized illegal Goan liquor worth ₹1.5 crore, arresting Yusuf Sheikh. The operation, a joint effort, intercepted a truck carrying 11,000 boxes of liquor near a railway flyover, preventing significant revenue loss for the state.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र