- किरण शिंदेपुणे - स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. स्वारगेट एसटी स्टँड येथे थांबल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. मात्र, तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यादरम्यान आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेचच तिथून फरार झाला.
पुणे हादरले..! स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाहीमध्येच अत्याचार; आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:23 IST