शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 22:28 IST

Acid Attack News: दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीवर तरुणांनी ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उत्तर पश्चिम दिल्लीमधील लक्ष्मीबाई कॉलेजजवळ घडली. पीडित विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात असतानाच आरोपींनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीवर तरुणांनी ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उत्तर पश्चिम दिल्लीमधील लक्ष्मीबाई कॉलेजजवळ घडली. पीडित विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात असतानाच आरोपींनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने या हल्ल्यात आपला चेहरा वाचवण्यात ही विद्यार्थिनी यशस्वी ठरली. मात्र या प्रयत्नात तिचे हात जळाले. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या जबावाच्या आधारावर गुन्हा नोंदवून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित तरुणीने जाबाबामध्ये सांगितले की, ती दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. तसेच ती क्लाससाठी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये जात होती. ती कॉलेजच्या दिशेने जात असताना तिच्या ओळखीतला जितेंद्र नावाचा तरुण इशान आणि अरमान या मित्रांसोबत दुचाकीवरून आला आणि हल्ला केला. दरम्यान, जितेंद्रसोबत असलेल्या इशान याने अरमानकडे एक बाटली दिली. तर अमरानने या विद्यार्थिनीवर ॲसिड फेकले, असा आरोप आहे. हल्ला होताच पीडित तरुणीने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिचे दोन्ही हात जळाले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पीडित तरुणीला मदत करत त्वरित रुग्णालयात पोहोचवले. तिच्या हातांना जखमा झाल्या असून, उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

जितेंद्र हा आपला पाठलाग करायचा आणि महिनाभरापूर्वी यावरून त्याच्यासोबत आपलं कडाक्याचं भांडण झालं होतं, असे पीडित तरुणीने आपल्या जबाबात सांगितले. आता पीडित तरुणीचा जबाब आणि तिला झालेल्या जखमांच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Acid attack on Delhi University student; acquaintance suspected.

Web Summary : A Delhi University student was attacked with acid near Lakshmi Bai College. The victim, while saving her face, suffered burns on her hands. Police have registered a case based on her statement, naming an acquaintance as the prime suspect who allegedly stalked her previously.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली