शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 18:37 IST

Panvel News: पनवेलमधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा  रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खारघरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या २६ वर्षीय सुशांत मल्ला या तरुणाचा मृतदेह चुकीने दुसऱ्या नेपाळी कुटुंबाला देण्यात आला.

-वैभव गायकरपनवेल - पनवेलमधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा  रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खारघरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या २६ वर्षीय सुशांत मल्ला या तरुणाचा मृतदेह चुकीने दुसऱ्या नेपाळी कुटुंबाला देण्यात आला. त्यांनी या मृतदेहाचे अंतिम संस्कारही केले.मात्र पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह कुटुंबियांना देताना झालेली अक्षम्य चुकीला पोलीसच जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

दोन्ही मृत व्यक्ती मूळचे नेपाळचे आणि समवयस्क असल्याने हा प्रकार घडला. शवविच्छेदनानंतर रुग्णालयात मृत्यू झालेल्या २५ वर्षीय तरुणाच्या नातेवाईकांनी चुकीचा मृतदेह ओळख करून ताब्यात घेतल्यामुळे पोलिस आणि रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप सुशांत यांच्या नातेवाईकांनी केले होते.मात्र या नातेवाईंकांनी देखील या घटनेत आपली चुक झाली असल्याचे नंतर मान्य केले.नियमांनुसार मृतदेहाची जबाबदारी घटनेची चौकशी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची असते.पनवेल शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील यावेळी घटनास्थळी उपस्थित होते.घटनेची गांभीर्य लक्षात घेता पनवेलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गीते यांनी संबंधित प्रकाराबाबत त्रसदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले.मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन पोलिसांकडे मृतदेह नातेवाईक सुपूर्द करण्याची जबाबदारी देत असते.या घटनेत देखील असेच झाले.रुग्णालय प्रशासन थेट मृतदेह नातेवाईंकाना देत नसल्याचे देखील डॉ गीते यांनी स्पष्ट केले.मात्र यापुढे अशा घटना घडणार नाहीत याकरिता याबाबत तृसदस्यीय समिती उपाययोजना आखेल.

दरम्यान पनवेल शहर पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या याबाबत प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याशि संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Panvel Hospital Mix-Up: Bodies Swapped, Cremated; Whose Fault?

Web Summary : A shocking mix-up at Panvel hospital led to the wrong body being cremated. Police negligence is suspected as bodies were swapped. An investigation is underway, focusing on police procedure during handover, as the hospital claims it follows protocol.
टॅग्स :hospitalहॉस्पिटलpanvelपनवेलMaharashtraमहाराष्ट्र