Pune Crime: डोक्यात दगड घालून केला खून केला; एका रात्रीत २ खुनानंतर शहरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 11:15 IST2021-10-13T11:14:37+5:302021-10-13T11:15:41+5:30

अल्पवयीन मुलीच्या हत्येची घटना घडली असताना आज सकाळी पुण्याच्या जनता वसाहत परिसरातून खुनाचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.

Pune Crime: Murder by throwing a stone at the head in Pune; Excitement in the city after 2 murders in one night | Pune Crime: डोक्यात दगड घालून केला खून केला; एका रात्रीत २ खुनानंतर शहरात खळबळ

Pune Crime: डोक्यात दगड घालून केला खून केला; एका रात्रीत २ खुनानंतर शहरात खळबळ

ठळक मुद्देजनता वसाहतीतील रामकृष्ण मठाच्या पाठीमागे मंगळवारी रात्री ही घटना घडली

पुणे : शहरात कालच सायंकाळी अल्पवयीन मुलीच्या हत्येची घटना घडली असताना त्याच दिवशी रात्री पुण्याच्या जनता वसाहत परिसरातून खुनाचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. एका ३८ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली आणि त्याच्या मृत्यू झाल्याचे समजताच मृतदेहाची पॅन्ट काढून घेत आरोपी पसार झाले. जनता वसाहतीतील रामकृष्ण मठाच्या पाठीमागे मंगळवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनं तर पुण्यात खळबळ उडाली आहे. 

योगेश अंकुश भोकरे (वय 38, रा. गल्ली नंबर 23, जनता वसाहत) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. व्यक्तीची पत्नी आदिती भोकरे (वय 31) यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून दत्तवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक २३ मध्ये राहतात. मंगळवारी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती नायटावरील औषध आणण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात आरोपीने त्यांच्या डोक्यावर आणि कपाळावर दगडाने मारून त्यांचा खून केला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेहाच्या अंगावरील पॅन्ट काढून कुठेतरी फेकून दिली. दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Pune Crime: Murder by throwing a stone at the head in Pune; Excitement in the city after 2 murders in one night