शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: आला राग अन् केला थेट वार; किरकोळ वादातून थेट खून, इतकी हिंसकता येते कुठून?

By नम्रता फडणीस | Updated: February 24, 2026 12:35 IST

Pune Crime रस्त्यात साधे कुणाला चांगल्या शब्दांत सांगण्याची देखील सोय राहिलेली नाही. काय माहिती कुणाच्या मनात राग येईल आणि कुणीतरी पटकन शस्त्र काढून वार करेल

पुणे : गाडीवरून उतरा असे म्हटल्याचा राग मनात धरून एकाला शिवीगाळ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पेवर ब्लॉक डोक्यात घालत मारहाण केल्याचा प्रकार रविवारी (दि.२२) स्वारगेट येथील डायमंड कॅफे समोर घडला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात २५ वर्षीय तरुणाने फिर्याद दाखल केली आहे. ही केवळ एकच घटना नव्हे, तर शहरात दिवसागणिक अशा गुन्हेगारीच्या घटनांनी पुणेकरांची झोप उडवली आहे.

रस्त्यात साधे कुणाला चांगल्या शब्दांत सांगण्याची देखील सोय राहिलेली नाही. काय माहिती कुणाच्या मनात राग येईल आणि कुणीतरी पटकन शस्त्र काढून वार करेल. अशी दहशतच सामान्य पुणेकरांच्या मनात निर्माण व्हावी, अशी स्थिती आहे. घराबाहेर पडलेला मुलगा घरी सुखरूप परत येईल ना? या भीतीने अनेक पालकांना ग्रासले आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात ही पराकोटीची हिंसकता येतेच कुठून?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये किरकोळ वादातून गंभीर मारहाण, खून, शिवीगाळ अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पार्किंगच्या वादातून मारहाण, कट मारणे, धक्का लागणे अशा छोट्या गोष्टींमधून थेट हात उचलण्यासह सोशल मीडियावरील पोस्टवरून दोन गटांमध्ये संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. रागावर नियंत्रण नसणे, सहनशीलतेचा अभाव आणि सामाजिक ताणतणाव यामुळे समाजातील हिंसक प्रवृत्ती वाढत आहे. व्यक्तीच्या वर्तणुकीत निर्माण होणारी हिंसक प्रेरणा, नैराश्य, स्वार्थ आणि चढाओढीचे युग यामुळे अनेकदा अशा क्रूर घटना घडतात. लहान मुलांमधील हिंसक प्रवृत्ती हे देखील चिंतेचे कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हिंसक प्रवृत्तीची प्रमुख कारणे

१) मानसिक आणि भावनिक तणाव : वैयक्तिक नैराश्य, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक कलह हिंसेला जन्म देऊ शकतात.
२) चुकीची संगती आणि वातावरण : सामाजिक आणि परिसरातील नकारात्मक वातावरण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सहवास.
३) सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव : वाढती चढाओढ, स्वार्थ आणि सहनशीलतेचा अभाव.
४) डिजिटल प्रभाव : हिंसाचार दाखवणारे चित्रपट, वेब सीरिज आणि सोशल मीडियाचा मुलांवर आणि तरुणांवर पडणारा प्रभाव.

घटना १ - १६ फेब्रुवारी

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून डोक्यात लाकडी बांबूने मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात घडली आहे.

घटना २ - १९ डिसेंबर २०२५

जनवाडी परिसरात (दि. १९ डिसेंबर) मध्यरात्री एका तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत २५ वर्षांचा युवक गंभीर जखमी झाला. आरोपी आणि युवक लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. काही दिवसांपासून दोघांमध्ये बोलणे बंद होते. याच रागातून लहानपणच्या मित्रावरच आरोपीने वार केले.

सध्याच्या धकाधकीच्या काळात कुणालाच वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. कुणाचेच आयुष्य शांततेत चाललेले नाही. सर्वांचीच सहनशक्ती कमी झाली आहे. प्रत्येक गोष्ट किंवा समस्या क्षणात सुटल्या पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटत आहे. संयम राहिलेला नाही. एखाद्याच्या मनात आले की, कृती करून टाकायची अशी मानसिकता आहे. स्पर्धेचे युग, वाढत्या ताण-तणावाबरोबरच वाहतूककोंडीची समस्यादेखील हिंसेचे कारण ठरत आहे. मुळातच लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. सोशल मीडियामुळे लोकांचा फोकसही कमी झालेला आहे. समाजात आपण कसे वागले पाहिजे? याचे लोकांनीच आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. सर्वांनी आयुष्यात नियमांचे पालन करायला हवे. तसेच, कायद्याची कडकपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. - डॉ. निकेत कासार, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Crime: Trivial Dispute Escalates to Murder; Where Does This Violence Come From?

Web Summary : Pune grapples with rising crime fueled by petty disputes escalating into violence, even murder. Experts cite stress, lack of tolerance, digital influence, and mental health as contributing factors. Recent incidents highlight alarming trends.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसEducationशिक्षणDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलPoliticsराजकारणHealthआरोग्य