शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
4
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
5
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
6
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
7
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
8
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
9
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
10
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
12
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
13
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
14
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
15
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
16
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
17
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
18
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
19
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
20
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेचा आरोप; पर्वती पोलिसांकडे तक्रार, कठोर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:39 IST

पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या अमन मुल्ला या व्यक्तीने पाकिस्तानचे समर्थन करत घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे

पुणे - पुणे शहरातील पर्वती परिसरात एका व्यक्तीने “पाकिस्तान जिंदाबाद” अशी घोषणा दिल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या अमन मुल्ला या व्यक्तीने पाकिस्तानचे समर्थन करत घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून यामुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.



या संदर्भात पर्वती पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, भारतात राहून परदेशी राष्ट्राचे उदात्तीकरण करणाऱ्या घोषणांमुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचतो तसेच देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात, असे सांगण्यात आले आहे.

तक्रारदारांनी असेही म्हटले आहे की, अशा प्रकारच्या घटनांकडे वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यात सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  ही तक्रार सकल हिंदू समाज, पुणे शहर यांच्या वतीने देण्यात आली असून निवेदनावर संबंधित संघटनेच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच पर्वती पोलीस ठाण्याचा अधिकृत शिक्का या निवेदनावर असल्याचेही समोर आले आहे. 

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत चौकशी सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीनंतर तथ्य स्पष्ट झाल्यास कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या या घटनेची चर्चा परिसरात सुरू असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: 'Pakistan Zindabad' Slogan Allegation; Complaint Filed, Strict Action Demanded

Web Summary : A complaint alleges pro-Pakistan slogans in Pune's Parvati area. Locals demand strict action, citing threats to national integrity and social harmony. Police investigation underway.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या