शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत गोळीबार प्रकरणातील आरोपी पुण्यातून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 16:11 IST

रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात १ ऑक्टोबर रोजी जमिनीच्या वादातून केंगार याने एकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता.

पुणे : जमिनीच्या वादातून रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात गोळीबार करुन पसार झालेल्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. शिवाजीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. सिद्धार्थ प्रभाकर केंगार (२४, रा. हेल्थ कॅम्प, महापालिका वसाहत, पांडवनगर, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात १ ऑक्टोबर रोजी जमिनीच्या वादातून केंगार याने एकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता.

याप्रकरणी केगार याच्या विरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंगार हा गोळीबार प्रकरणात पसार झाला होता. कर्जत पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. केंगार हा वडारवाडी परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस हवालदार शंकर कुंभार, उज्ज्वल मोकाशी, विजयकुमार पवार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. केंगार याला कर्जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साेनवणे, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, कुंभार, मोकाशी, पवार, संजय जाधव, सर्जेराव सरगर, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी, गणेश आबनावे यांनी ही कामागिरी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Karjat Shooting Suspect Arrested in Pune: Police Action

Web Summary : A suspect in the Karjat shooting case, stemming from a land dispute, was arrested in Pune. The accused, Siddharth Kengar, had allegedly shot someone in Karjat. He was on the run and has been handed over to Karjat police.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी