Pune: गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी २१ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 19:58 IST2026-04-14T19:58:33+5:302026-04-14T19:58:48+5:30

चोरटयांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष व्यावसायिकाला दाखविले होते. त्यानंतर व्यावासायिकाला समाज माध्यमातील समुहात सहभागी करुन घेतले

Pune: Businessman duped of Rs 1 crore 21 lakh by luring him with investment | Pune: गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी २१ लाखांचा गंडा

Pune: गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी २१ लाखांचा गंडा

पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची एक कोटी २१ लाख रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५८ वर्षीय व्यावसायिक मुंढव्यातील केशवनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी व्यावासायिकाच्या समाज माध्यमातील खात्यावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर व्यावासायिकाला समाज माध्यमातील समुहात सहभागी करुन घेतले. शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजना, तसेच परताव्याबाबतची माहिती चोरट्यांनी त्यांना दिली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. व्यावसायिकाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी २१ लाख ९२ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचा संदेश पाठविला. मात्र, त्यांच्या खात्यात परताव्याची रक्कम जमा केली नव्हती. चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संदेश पाठविला, चोरट्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई (ई-चलन) करण्यात आली असून, दंडात्मक कारवाईची पीडीएफ फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची चार लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, तक्रारदार तरुण हडपसरमधील फुरसुंगी परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर दंडात्मक कारवाईची पीडीएफ फाईल पाठविली होती. ही फाईल उघडताच चोरट्यांनी त्याचा मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला होता. चोरट्यांनी मोबाइल क्रमांक हॅक करुन तरुणाच्या खात्यातून रोकड लांबविली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.

Web Title : पुणे: निवेश के नाम पर व्यवसायी से ₹1.21 करोड़ की धोखाधड़ी

Web Summary : पुणे में एक व्यवसायी को निवेश का लालच देकर साइबर ठगों ने ₹1.21 करोड़ ठग लिए। अलग से, फुरसुंगी में एक युवक को नकली ट्रैफिक चालान पीडीएफ खोलने के बाद ₹4.24 लाख का नुकसान हुआ, जिससे हैकर्स को उसके बैंक खाते तक पहुंच मिल गई। पुलिस दोनों मामलों की जांच कर रही है।

Web Title : Pune Businessman Duped of ₹1.21 Crore in Investment Scam

Web Summary : A Pune businessman lost ₹1.21 crore to cyber fraudsters promising high investment returns. Separately, a young man in Fursungi was defrauded of ₹4.24 lakh after opening a fake traffic fine PDF, which allowed hackers to access his bank account. Police are investigating both cases.