'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:17 IST2025-03-13T11:16:27+5:302025-03-13T11:17:36+5:30

आज पुण्यात वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवर जनतेचा मनातील आमदार अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे.

pune Bitterness remains in the Mahayuti ravindra dhangekar entry and banners that scare Rasane | 'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस

'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस

पुणे - काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करताच, कसबा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे. धंगेकर यांच्या समर्थकांनी जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावत भाजप आमदार हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला, त्यामुळे शिंदेसेनेचे स्थानिक शिलेदार तर अस्वस्थ झाले आहेतच, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाही जाहीर नाराजी व्यक्त करण्यात सुरूवात केली आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काही बोलत असतील तर ते त्यांचे अनुभवातून आलेले मत आहे, असे म्हणत खुद्द उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही नाराज भाजप कार्यकर्त्यांची पाठराखण केली होती.



अशात आज पुण्यात वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवर जनतेचा मनातील आमदार अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. या  फ्लेक्सवर धंगेकर यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आमदार हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न चर्चेत आला आहे.  

तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदार संघात हेमंत रासने यांनी धंगेकरांचा पराभव केला होता. आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात अशा प्रकारचे बॅनर लावून हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान पुण्यात महायुतीतील हा संघर्ष आगामी निवडणुकीत काय वळण घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: pune Bitterness remains in the Mahayuti ravindra dhangekar entry and banners that scare Rasane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.