शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर प्रवाशांची 'पायपीट'; नवीन टर्मिनल असूनही समस्या जुन्याच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:17 IST

- पुणे विमानतळावर प्रवाशांची ‘पायपीट’; नवीन टर्मिनल तरीही समस्या जुन्याच

 - अशोक काकडे

लोहगाव : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (लोहगाव) प्रवाशांच्या सोयीसाठी अब्जावधी रुपये खर्च करून नवीन टर्मिनल उभारले खरे, मात्र प्रवाशांची ‘पायपीट’ अजूनही संपलेली नाही. साधे दिशादर्शक फलक लावण्याबाबतही प्रशासन उदासीन असल्याने, प्रवाशांचा मोठा गोंधळ होत असून, याचाच फायदा घेऊन टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

एरोमॉलची ‘अडचणीची’ वारी : प्रवाशांना एरोमॉलमधील टॅक्सी स्टॅण्डपर्यंत व पुढे विकफिल्ड चौकापर्यंत नेण्यासाठी असलेल्या शटल बसचा पत्ता प्रवाशांना लागत नाही. रात्री-अपरात्री येणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह असलेल्या पालकांना जड लगेज घेऊन प्रस्थान गेटपासून एरोमॉलपर्यंत अक्षरशः १ ते १.५ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

ओला-उबेर प्रवाशांची कोंडी : ओला आणि उबेरच्या मिनी कॅबला अद्यापही एक्झिट गेटजवळ येण्यास बंदी आहे. परिणामी, प्रवाशांना एकतर लांब अंतरावर चालत जावे लागते किंवा तिथेच उपलब्ध असलेल्या खासगी मोठ्या गाड्यांना ‘अव्वाच्या सव्वा’ भाडे देऊन प्रवास करावा लागतो.

टॅक्सी दरांचा मनमानी कारभार : ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत भाड्याचा अजब प्रकार समोर आला आहे. कोथरूडसाठी १००० रुपये मागितले जातात, तर त्यापेक्षा कमी अंतर असलेल्या मगरपट्टा सिटी, शिवाजीनगरसाठी चक्क ११०० रुपये तर लोहगावसाठी ८०० रुपये भाडे आकारले जात आहे. या मनमानी दरांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. टॅक्सी संघटना हे दर विमानतळ प्राधिकरणाने ठरवल्याचा दावा करत आहेत, तर प्राधिकरण प्रशासन हे दर आम्ही ठरवलेच नसल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकत आहे.

पीएमपीएल बससेवेची दैनावस्था

विमानतळावरून कोथरूड, भोसरी, शिवाजीनगर, खराडी, वाघोली, हडपसर, लोहगाव आणि पिंपरी चिंचवड या भागांसाठी सुटणाऱ्या पीएमपीएल वातानुकूलित बसेसची माहिती देणारे एकही डिजिटल बोर्ड किंवा साधे फलक विमानतळ परिसरात नाहीत. बस नेमकी कधी येणार आणि कुठून सुटणार, हे शोधण्यातच प्रवाशांचा तासन्तास वेळ वाया जात आहे.

प्रमुख मागण्या -

१. विमानतळाच्या प्रत्येक एक्झिट गेटवर ‘माहिती केंद्र’ आणि प्रतिनिधी असावेत.

२. विमान लॅण्ड होऊन प्रवाशी एक्झिट गेटवर आल्यानंतर एरोमॉल, रामवाडी मेट्रो आणि विकफिल्ड शटल बस तयार असाव्यात. बसची संख्या वाढवावी, वेळा दर्शवणारे मोठे डिजिटल बोर्ड लावावेत.

३. खासगी कॅब किंवा टॅक्सींचे शहराच्या विविध प्रमुख भागांसाठीचे अधिकृत दरपत्रक प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी लावावे.

४. पीएमपीएल बस थांब्यावर क्यूआर कोडद्वारे माहिती उपलब्ध करून द्यावी.

पुण्याचा विस्तार पाहता विमानतळावरील पायाभूत सुविधा वाढल्या असल्या, तरी प्रवाशांसाठी सुलभ व्यवस्था करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. या लूटमारीला वेळीच चाप न लावल्यास पुणे विमानतळाची प्रतिमा मलीन होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

प्रवाशांचा संताप

आम्ही श्रीनगरहून रात्री उशिरा पुण्यात पोहोचलो; पण तिथे कोणतेही माहिती फलक नव्हते. कर्मचाऱ्यांना विचारले तर योग्य मदत मिळाली नाही. मिनी टॅक्सी बुक केली तर चालकाने एरोमॉलला बोलावले. एवढ्या मोठ्या विमानतळावर साधे मार्गदर्शक फलक किंवा प्रतिनिधी नसावेत, हे पुण्याचे दुर्दैव आहे. - शिवदास भगत, प्रवासी, चंदननगर.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Airport: Lack of Information Leads to Taxi Driver Exploitation

Web Summary : Pune Airport lacks basic information, causing passenger confusion. Taxi drivers exploit this, charging exorbitant fares. Poor signage for PMPML buses and Ola/Uber restrictions worsen the situation. Passengers demand information centers and regulated fares to stop the exploitation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAirportविमानतळ