दीड वर्षाच्या बालिकेला पाण्याच्या टँकरने चिरडले; खराडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:53 IST2025-10-07T17:52:03+5:302025-10-07T17:53:18+5:30
साकेत दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील असून खराडी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पात ते मजुरी करतात

दीड वर्षाच्या बालिकेला पाण्याच्या टँकरने चिरडले; खराडी येथील घटना
पुणे : घरासमोर खेळणाऱ्या दीड वर्षाच्या बालिकेला पाण्याच्या टँकरने चिरडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. याप्रकरणी खराडी पोलिसांनी टँकरचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा विलास कंधारे (रा. पठारे वस्ती, खराडी) असे गुन्हा दाखल झालेल्या टँकरचालकाचे नाव आहे. तर आकांक्षा पुष्पेन साकेत (वय दीड वर्ष) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत मृत आकांक्षाची आई रामकली पुष्पेन साकेत यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकेत दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील असून खराडी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पात ते मजुरी करतात. येथील बांधकाम मजुरांच्या वसाहतीत ते राहायला आहेत. मृत आकांक्षा सोमवारी (६ ऑक्टोबर) घरासमोर खेळत होती. त्यावेळी तिला पाण्याच्या टँकरने चिरडले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कोळपे करत आहेत.