Pune Accident: रस्त्यावरून थेट फुटपाथवर घुसली; झाड व कारच्या मध्ये चेंबून २१ वर्षीय मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:20 IST2025-06-13T16:18:54+5:302025-06-13T16:20:39+5:30

कार चालक हा मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसून नारळाचे झाड तोडून पायी चालत येणाऱ्या मुलीस धडकला

Pune Accident: 21-year-old girl dies after being crushed between a tree and a car after going straight from the road onto the pavement | Pune Accident: रस्त्यावरून थेट फुटपाथवर घुसली; झाड व कारच्या मध्ये चेंबून २१ वर्षीय मुलीचा मृत्यू

Pune Accident: रस्त्यावरून थेट फुटपाथवर घुसली; झाड व कारच्या मध्ये चेंबून २१ वर्षीय मुलीचा मृत्यू

कात्रज : गंगाधाम चौकामध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता तर एक ईसम जखमी होता. ही घटना ताजी असतानाच कात्रज सुखसागर नगर परिसरामध्ये यशश्री सोसायटी च्या समोर पायी चाललेल्या मुलीला जोरदार येणाऱ्या टुरिस्ट व्हॅगन आर कारने एम. एच. १२ यु. एम.४८४७. जोराची धडक दिली. यामध्ये श्रेया गौतम येवले (वय 21,शीतल हाईट्स, खंडोबा मंदिर जवळ कोंढवा पुणे) या मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झाला. 

कार चालक हा मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसून नारळाचे झाड तोडून पायी चालत येणाऱ्या मुलीस धडकला. समोर असणारे बदामाचे झाड व कार त्यामध्ये सापडून मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ, बिबेवाडी व कोंढवा पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत ससून येथे शवविच्छेदनासाठी  पाठवण्यात आले आहे. तर कार चालक सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७ रा गोकुळ नगर)  याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटना स्थळी गर्दी केली असून वाहन चालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. सतीश होनमाने हे कंपनीची कार भाडे तत्वावर चालवत होते. ती कार त्यांचे नातेवाईक दत्तात्रेय भरत गाडेकर (वय 45 शिक्षक सोसायटी गोकुळ नगर कात्रज)  यांना शिकवत असताना अपघात झाला. यात श्रेया गौतम येवले हिचा जागीच मृत्यू झाला.

कार चालक एवढ्या जोरामध्ये होता की, अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. यावरून अपघाताची दाहकता लक्षात येते असे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. नागरी वस्तीमध्ये वेगाने वाहन चालवल्या मुळे अपघात होतात. त्याचबरोबर अवजड वाहनांची देखील वाहतूक सर्रासपणे चालू असते. यावर प्रशासनाकडून लगाम लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली.

Web Title: Pune Accident: 21-year-old girl dies after being crushed between a tree and a car after going straight from the road onto the pavement