शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या प्रवाशांची माहिती करणार प्रसिध्द : रेल्वे प्रशासनाचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 20:13 IST

प्रवाशांचे नाव, छायाचित्र, मोबाईल क्रमांक ही माहिती प्रसिध्द केल्यास फुकट प्रवास करण्याला आळा बसेल,

ठळक मुद्देपुणे विभागाकडून एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ८२ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई

पुणे : फुकट्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त झालेल्या रेल्वे प्रशासनाकडून या प्रवाशांची माहिती प्रसिध्द करण्याचा विचार केला जात आहे. या प्रवाशांचे नाव, छायाचित्र, मोबाईल क्रमांक ही माहिती प्रसिध्द केल्यास फुकट प्रवास करण्याला आळा बसेल, असे रेल्वे प्रशासनाला वाटते. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होऊ शकते, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील सुत्रांनी दिली. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ८२ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४ कोटी ६२ लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर या मार्गांवर ही कारवाई करण्यात आली. मागील काही वर्षात रेल्वेने या कारवाईसाठी विशेष पथकेही तयार केली आहेत. तरीही तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वर्षागणिक वाढत चालली आहे. सातत्याने कारवाई करूनही आळा बसत नसल्याने रेल्वे प्रशासन त्रस्त झाले आहे.यापार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांना अद्दल घडविण्यासाठी त्यांची माहिती प्रसिध्द करण्याचा विचार सुरू केला आहे. या प्रवाशांची छायाचित्रे, नाव, मोबाईल क्रमांक आदी माहिती प्रसिध्दीमाध्यमांमध्ये प्रसिध्दीस देण्याचे विचाराधीन आहे. तसेच स्थानकांवरही ही माहिती लावली जाईल. या माध्यमातून संबंधित प्रवाशांवर वचक राहील. तसेच बदनामीच्या भितीने इतर प्रवासीही फुकट प्रवास करण्याचे टाळतील, असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.---------तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचे नाव, छायाचित्र, मोबाईल क्रमांक आदी माहिती प्रसारमाध्यमांमध्ये देण्याचा विचार सुरू आहे. ही माहिती प्रसिध्द झाल्यास फुकट प्रवास करणे प्रवाशांकडून टाळले जाईल. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीticketतिकिट