शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला संरक्षण द्या', कबड्डी खेळाडूच्या खून प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांची गृहमंत्री यांच्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 12:02 IST

पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या क्षितिजा अनंत व्यवहारे या मुलीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता

ठळक मुद्देपुण्यात कबड्डी खेळाडूच्या खून प्रकरणात आरोपीपासून मुलीच्या कुटुंबियांना धोका असल्याचे दिले निवेदन

पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या कबड्डी खेळाडू क्षितिजा अनंत व्यवहारे या मुलीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण पुणे हादरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले होते. त्यानंतर ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत या मुख्य आरोपीसह ३ अल्पवयीन मुलांना देखील बिबवेवाडीपोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात आज क्षितिजाच्या कुटुंबीयांच्या वतीने महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे. आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे. 

''सदरच्या खुनाचा खटला हा फास्टट्रॅक न्यायालयांमध्ये चालवण्यात यावा व विशेष सरकारी वकील म्हणून कुटुंबियांच्या वतीने हेमंत देवराम झंजाड यांची महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्त करावी. तसेच मुलीच्या कुटुंबियांना आरोपीपासून जीविताला धोका आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशीही  मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.'' 

अजित पवारांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुलीला वाहिली होती श्रद्धांजली 

''पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे. शाळेत शिकणाऱ्या कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे असं पवार म्हणाले होते.''

एकतर्फी प्रेमातून झाला होता हा प्रकार झाला 

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती कबड्डीपटू होती. काल सायंकाळी ती मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती. ज्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केलाय. त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून देऊन पळ काढला होता. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला होता. त्यानंतर मुख्य आरोपीसह ३ अल्पवयीन मुलांना देखील बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते

टॅग्स :BibvewadiबिबवेवाडीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील