स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ८ महिलांची सुटका, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST2021-09-10T04:13:59+5:302021-09-10T04:13:59+5:30

पुणे : स्पाच्या नावाखाली बालेवाडी फाटा येथील कणक स्पामध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणले. या ...

Prostitution under the name of spa, 8 women released, 2 arrested | स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ८ महिलांची सुटका, दोघांना अटक

स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ८ महिलांची सुटका, दोघांना अटक

पुणे : स्पाच्या नावाखाली बालेवाडी फाटा येथील कणक स्पामध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणले. या ठिकाणाहून पोलिसांनी ८ पीडित महिलांची सुटका केली असून स्पा मालक व मॅनेजरला अटक केली आहे.

स्पा मालक ज्योती राहुल नायडू (वय ४५, रा. अशोका सोसायटी, काळेवाडी फाटा) आणि मॅनेजर निकित मोतीलाल अगरवाल (वय २४, रा. शुक्रतारा सोसायटी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला हवालदार नीलम शिंदे यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बालेवाडी फाटा येथील कणक स्पा येथे स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेतला असल्याची सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी ४ वाजता येथे छापा टाकला. तेव्हा तेथून ८ महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. स्पा मालक व मॅनेजर यांना अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Prostitution under the name of spa, 8 women released, 2 arrested