शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

देशात पाच लाख टन साखरेचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 22:00 IST

उत्तरप्रदेश आघाडीवर : देशातील दीडशे कारखाने झाले सुरु

ठळक मुद्देगेल्यावर्षी याच काळात देशभरातील ३१० साखर कारखाने सुरु महाराष्ट्रात २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात १५ नोव्हेंबर अखेरीस १४९ साखर कारखाने सुरु

पुणे : देशातील शंभर साखर कारखाने सुरु झाले असून, त्यात ४.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील ऊस गाळपास २२ नोव्हेंबर पासून सुरुवात झाला आहे. मात्र, अजूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कारखाने सुरु झाले असल्याने गेल्यावर्षीपेक्षा देशाचे साखर उत्पादन निम्मे देखील झालेले नाही. गेल्यावर्षी याच काळात देशभरातील ३१० साखर कारखाने सुरु झाले होते. लांबलेला पाऊस आणि उसाचे नुकसान झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कारखाने सुरु होण्यास विलंब लागला. महाराष्ट्रात २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात १५ नोव्हेंबर अखेरीस १४९ साखर कारखाने सुरु झाले होते. तसेच, ६.३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा हंगाम २२ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. सद्य:स्थितीत राज्यातील सहा कारखानेच सुरु झाले आहेत. कर्नाटकातील १८ कारखाने सुरु झाले असून, १.४९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्यावर्षी ५३ कारखान्यात ३.६० लाख टन साखर उत्पादित झाली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यातच यंदा झालेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाल्याने साखरेच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत ४५ ते ५० लाख टनांची घट होण्याचा अंदाज आहे. उत्तरप्रदेशातील ६९ कारखाने सुरु झाले असून, २.९३ लाख टन साखर उत्पादित झाली होती. गेल्यावर्षी याच काळात १.७६ लाख टन साखर उत्पादित झाली होती. उत्तराखंड आणि बिहारमधील प्रत्येकी २, हरयाणा १, गुजरात ३ आणि तमिळनाडूमधील ५ कारखाने सुरु झाले आहेत. या कारखान्यांनी ४९ हजार टन साखर उत्पादित केली आहे. -------------------देशात २ लाख टन साखरेची निर्यात देशातील ५३५ कारखान्यांच्या गोदामामधे १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. त्यामुळे यंदा ६० लाख टन साखर निर्यातीस केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पैकी २ लाख टन साखरेची निर्यात झाली असून, १२ लाख टन साखर निर्याचीचे करार झाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार