शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतल्या 'वायसीएम' मध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता खासगी 'बाऊन्सर्स'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 19:11 IST

डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ व दमदाटीच्या वारंवार घटना

ठळक मुद्देखासगी सुरक्षा सरक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ५ आॅगस्टच्या सभेत मान्यतेसाठी

पिंपरी : काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रूग्णांच्या नातेवाइकांकडून आणि एका नगरसेवकाकडून शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार घडला होता. घडलेल्या प्रकाराचा निषेध म्हणून, २७ जुलै ला वायसीएममधील डॉक्टरांनी आंदोलन केले होते. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ५ आॅगस्टला होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत मान्यतेसाठीे ठेवण्यात येणार आहे.  स्थायी समितीने मान्यता दिल्यास ही सुरक्षा देण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. सहा लाख रूपयांच्या हा प्रस्ताव आहे. एका पाळीत १ महिला सुरक्षा रक्षक, व ३ पुरूष सुरक्षा रक्षक असणार आहेत. असे तिन्ही पाळीत एकुण बारा सुरक्षा रक्षक असणार आहेत. पुढील दोन महिन्यांसाठी कंत्राटी स्वरूपात सुरक्षा रक्षक  घेण्यात येणार आहे. प्रत्येक सुरक्षा रक्षकाला २५००० रूपये मानधन देण्यात येणार आहे.  वायससीएम रूग्णालय हे कोरोनाच्या रूग्णांसाठी समर्पित करण्यात आले आहे. रोजच कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. पुन्हा डॉक्टरांना धक्काबुक्की,शिवीगाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ही सुरक्षा देण्यात येणार आहे. धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर डॉक्टरांनी आंदोलन केले होते. महानगरपालिका आयुक्त,अतिरिक्त आयुक्त,महापौर यांच्यात चर्चा झाली होती. तेव्हा सुरक्षित वातावरणाची हमी डॉक्टर अणि रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. शिविगाळ अणि दमदाटीच्या प्रकारामुळे डॉक्टर आणि रूग्णालयातील कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर