शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे छपाई उद्योग तेजीत

By admin | Updated: February 15, 2017 02:33 IST

महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचे अहवाल, राजकीय पक्षांचे जाहीरनामे यामुळे शहरातील छपाई उद्योगाला तेजी आली आहे.

पुणे : महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचे अहवाल, राजकीय पक्षांचे जाहीरनामे यामुळे शहरातील छपाई उद्योगाला तेजी आली आहे. शनिवार पेठेतील कागद बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल झाली असून, आता कागद ब्लॅकने विकला जात आहे. छपाईच्या कामांनी शनिवार, नारायण पेठेतील बहुसंख्य छापखाने बुक झाले असून, आता कामे पुण्याबाहेरून करून आणली जात आहे. किमान १ हजार टन तरी कागदाचा वापर झाला असेल, असा या क्षेत्रातील माहीतगारांचा अंदाज आहे. छपाईशी संबंधित गोष्टींचे दरही भरमसाट वाढवण्यात आले आहेत. गुळगुळीत कागदावर, छायाचित्रांचा सुकाळ व आश्वासनांचा भडिमार असलेले अहवाल ही निवडणुकीतील उमेदवाराची ओळख झाली आहे. यासाठी लागणारा आर्ट पेपर शनिवार पेठेतील पेपर मार्केटमध्ये मिळतो. गेल्या महिनाभरात या मार्केटमध्ये आर्ट पेपरला जोरदार मागणी आहे, असे तेथील व्यावसायिकांनी सांगितले. कागदाची गुणवत्ता तो किती किलोचा आहे त्यावर मोजली जाते. ९० जीएसएम व १३० जीएसम असे दोन प्रकार आहेत. एक रिम साधारण १६ किलोची असते. तिची किंमत १७०० ते १८०० रूपये आहे. २० हजार प्रतीचा सर्वसाधारण आकाराचा एक अहवाल करायचा असेल तर ८० रिम कागद लागतो. मागणी असल्याने कागदाचे, छपाईचे, मजकूर डीटीपी तयार करून घेण्याचे दर वाढले आहेत. प्रत्येक ठिकाणी साधारण २०० ते ३०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यातून गेल्या महिनाभरात या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. व्यावसायिक फोटोग्राफर्सनाही उमेदवारांकडून चांगली मागणी आहे. विविध पोझमधील छायाचित्र काढून त्यावर प्रक्रिया करून ती वापरली जात आहेत. (प्रतिनिधी)