शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

शेलपिंपळगाव : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण, खाऊ वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी तसेच गोशाळेतील ...

शेलपिंपळगाव : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण, खाऊ वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी तसेच गोशाळेतील जनावरांना चारा वाटप, तसेच अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय वह्या-पुस्तके वाटप करून साजरा करण्यात आला.

प्रारंभी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात अव्वल आल्याबद्दल शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बहूळ ग्रामपंचायतीच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला आला. तर सोमनाथ वाडेकर यांच्यावतीने कोयाळी-भानोबाची येथील गोशाळेत जनावरांना मोफत चारा वाटप करण्यात आला. सिद्धेगव्हाण येथील मल्लसम्राट कुस्ती संकुलात नवोदित मल्लांना पै. अनिल साबळे यांच्यावतीने पोषक आहार वाटप करण्यात आला. तर शेलपिंपळगाव व ठाकूर-पिंपरी येथील अनाथ आश्रमातील मुलांना शालेय वह्या -पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, बहूळ वनविभाग हद्दीत विविध वृक्षांची लागवड करून वृक्ष वाचविण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, ज्येष्ठ विधिज्ञ सुखदेव पानसरे, सरपंच विद्या मोहिते, बहूळचे सरपंच गणेश वाडेकर, बेबीताई वाडेकर, संदीप मोहिते, गणेश दौंडकर, पोलीस पाटील केशव साबळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गुलाब वाडेकर, अंकुश साबळे, पंडित वाडेकर, रूपाली खलाटे, आदिक वाडेकर, शिवाजी पानसरे, विशाल दौंडकर, ग्रामविकास अधिकारी बी. आर. मतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे आदींसह मान्यवर कर्मचारी उपस्थित होते. सरपंच गणेश वाडेकर यांनी आभार मानले.

कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर्स तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णांना उत्तम सेवा पुरवली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य केंद्राला सतत सहकार्य असून नागरिकांच्या आरोग्याचा प्राधान्य देत रुग्णालयात आवश्यक ती साधनसामग्री पुरवली जाईल.

- निर्मला पानसरे, अध्यक्षा पुणे जिल्हा परिषद

०५ शेलपिंपळगाव वृक्षारोपण

बहूळ (ता. खेड) येथे वृक्षारोपण करताना निर्मला पानसरे व ग्रामस्थ.