शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन कृती आराखडा तयार

By admin | Updated: May 31, 2014 07:07 IST

महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या कामांना प्राधान्य दिले असून, नालेसफाई, नदीतील जलपर्णी काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे

पिंपरी : महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या कामांना प्राधान्य दिले असून, नालेसफाई, नदीतील जलपर्णी काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांच्या निविदा प्रक्रियेस अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करून महापालिकेने आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यापूर्वीची कामे करून घेतली आहेत. आपत्कालीन परिस्थिती कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आयुक्त राजीव जाधव यांनी पुढाकार घेऊन स्वच्छता अभियानाला प्राधान्य दिले. त्यामुळे गटारे, नालेसफाईची कामेही झाली आहेत. प्रभाग स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्याची जबाबदारी आयुक्त जाधव यांनी प्रभाग अधिकार्‍यांवर सोपवली आहे. त्या प्रभागातील कनिष्ठ अभियंते, आरोग्य निरीक्षक, मुकादम यांना सूचना दिल्या असल्याने स्वच्छतेची कामे बर्‍यापैकी झाली आहेत. पावसाळ्यात पवना नदीस पूर आल्यास तातडीच्या उपाययोजनांसाठी नुकतीच क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पूरनियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रशासकीय इमारतीत मुख्य पूरनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एकूण सात ठिकाणी स्थापन केलेल्या पूरनियंत्रण कक्षाची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध असेल. हेल्पलाइन सुविधेचा वापर करून ते आपत्कालीन परिस्थितीबाबत या नियंत्रण कक्षाला कळवतील. आवश्यक ती तातडीची मदत पुरविण्याचे काम कक्षातर्फे केले जाईल. नदीपात्रालगतची अतिक्रमणे हटवावीत, नदीकाठी राहणार्‍या रहिवाशांना पुराच्या धोक्याबाबत पूर्वकल्पना देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार संबंधित रहिवाशांना नोटीस पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. या वर्षी पहिल्यांदाच पुलाच्या ठिकाणी पाण्याच्या पातळीचे प्रमाण लक्षात येण्यासाठी मार्किंग करण्यात येणार आहे. पाटबंधारे खात्यामार्फत चिंचवड, रावेत, सांगवी, पिंपरी, पिंपळे सौदागर या ठिकाणी पुलाला मार्किंग केले जाणार आहे.(प्रतिनिधी)