शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गजा मारणेच्या 6 साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 23:28 IST

दहशत माजविण्याच्या उद्देशाने मिरवणूक काढल्याप्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसात गुन्हा दाखल आहे

ठळक मुद्देदहशत माजविण्याच्या उद्देशाने मिरवणूक काढल्याप्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसात गुन्हा दाखल आहे

पुणे:  आरोपींनी आणखी कुठे दहशत निर्माण केली आहे का?, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्यांना अटक होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा सरकारी वकिलांचा युक्तीवाद  मान्य करीत न्यायालयाने गुंड गजा मारणे याच्या सहा साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.  

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला.  रूपेश कृष्णा मारणे, सुनिल नामदेव बनसोडे, संतोष सुधाकर शाळीमकर, महेश काशिनाथ गुरव, सचिन आप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार अशी जामीन फेटाळण्यात  आलेल्यांची नावे आहेत. दि. 15 फेब्रुवारी रोजी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून गुंड गजा मारणे याची सुटका झाली. त्यावेळी मारणे त्याच्या साथीदारांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदा गर्दी जमवून फटाके वाजवून आरडा-ओरडा करत त्याचे चित्रीकरण केले. तसेच मास्क न लावता कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सहा जणांनी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी विरोध केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत सहा जणांचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी गजानन मारणे याने 25 फेब्रुवारी रोजी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समोर हजर होऊन जामीन घेतला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय