गुळुंचेच्या उपसरपंचपदी प्रवीण निगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:10 IST2021-03-07T04:10:58+5:302021-03-07T04:10:58+5:30

गुळुंचे तालुका पुरंदर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक मागील तीन वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी थेट सरपंच निवड संभाजी कुंभार यांची झाली ...

Praveen Nigde as Gulunche's sub-panch | गुळुंचेच्या उपसरपंचपदी प्रवीण निगडे

गुळुंचेच्या उपसरपंचपदी प्रवीण निगडे

गुळुंचे तालुका पुरंदर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक मागील तीन वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी थेट सरपंच निवड संभाजी कुंभार यांची झाली होती. त्यावेळी पहिल्या सत्रामध्ये शीतल नीलेश निगडे, संतोष विश्वास निगडे व त्यानंतर चंदा दशरथ निगडे यांचा उपसरपंचपदाचा नियोजित कार्यकाळ झाला होता. पूर्वी ठरल्याप्रमाणे प्रवीण निगडे यांची निवड शुक्रवार, दि.०५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आली. यावेळी दहा पैकी नऊ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच संभाजी कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली या निवडणुकी दरम्यान प्रवीण निगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुकीच्या वेळे अंती निगडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या वेळी सरपंच यांना ग्रामसेवक जयंत सुळ यांनी सहकार्य केले. या वेळी माजी उपसरपंच शीतल नीलेश निगडे, संतोष विश्वास निगडे, चंपा दशरथ निगडे, संतोष भगवान निगडे, विकास भंडलकर, संगीता नेवसे, उषा पाटोळे हे उपस्थित होते.

०६ नीरा निगडे

Web Title: Praveen Nigde as Gulunche's sub-panch