शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक शिक्षण परीक्षेबाबत ‘पोरखेळ’ - मैदानावर चाचणी घेण्याचे निर्देश; दोन हजार विद्यार्थ्यांचे नियोजन कसे करायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:09 IST

शारीरिक शिक्षण विषयासाठी एकूण ५० गुण आहेत. त्यात २५ गुणांची लेखी आणि २५ गुणांची मैदानी चाचणी घेतली जाते. ...

शारीरिक शिक्षण विषयासाठी एकूण ५० गुण आहेत. त्यात २५ गुणांची लेखी आणि २५ गुणांची मैदानी चाचणी घेतली जाते. या विषयाची परीक्षा घेण्यासाठी शारीरिक शिक्षकांची नुकतीच झूम मिटिंग घेण्यात आली. त्यामध्ये शारीरिक शिक्षकांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातून फारसे काहीच समाधानकारक चित्र पुढे आले नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. मैदानावर परीक्षा घ्यायची कशी ? याबाबत काहीच माहिती दिली नाही. तसेच झूम मिटिंगमध्ये शिक्षकांना प्रश्न विचारण्याची संधी दिली नाही. त्यानंतर राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर याविषयीचे परिपत्रक टाकले आहे. त्यावरही दिनांक, मंडळाचा शिक्का किंवा कोणत्याच अधिकाऱ्याची सही नाही. त्यामुळे हे अधिकृत समजायचे का? असा प्रश्नही शिक्षकांना पडला आहे. येत्या २३ एप्रिलपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे.

==================

२ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार?

कोरोनाच्या काळात मैदानावर विद्यार्थी बोलावून परीक्षा घेणार कशी ? कारण एकत्र आले की गर्दी होऊ शकते. त्यातून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका महाविद्यालयात २ हजार विद्यार्थी शारीरिक शिक्षणाची परीक्षा देणार आहेत. आता त्यांचे पंधरा-पंधरा जणांचे गट करून परीक्षा घेतली, तर त्याला किती दिवस लागतील. एकूणच हा पर्याय धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया प्राध्यापकांची आहे.

=========

मैदानाऐवजी लेखीच परीक्षा घ्या

सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना मैदानावर बोलवून परीक्षा घेणे धोकादायक ठरू शकते. याचा शासनाने गंभीरपणे विचार करावा आणि शारीरिक शिक्षण या विषयासाठी सध्याच्या परिस्थितीत प्रात्यक्षिक परीक्षा न घेता फक्त लेखी परीक्षा घेऊन यंदाच्या वर्षी ग्रेड देण्यात याव्यात, असा पर्याय काही शिक्षकांनी सुचविला आहे. तसेच मैदानावर परीक्षा घेण्याला पालकांचा देखील विरोध आहे.

===========

कडक निर्बंधात परीक्षा घ्यावी का ?

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या महिन्यात सुरू होणाऱ्या परीक्षांबाबतही काय निर्णय होणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. त्यातच, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, याबाबतही सरकार विचार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्येच या शारीरिक शिक्षण विषयावर परिक्षा घ्यावी, असे परिपत्रक आले आहे. त्यामुळे शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम आहे. एमपीएससी परीक्षाही पुढे ढकलली, मग शारीरिक शिक्षणाची मैदानावर कशाला, असा सवालही उपस्थित होत आहे.