नंदकिशोर मंदिराजवळीस स्वच्छतागृहाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST2021-04-20T04:12:14+5:302021-04-20T04:12:14+5:30

श्रध्दास्थान असलेल्या नंदकिशोर मंदिराजवळील स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली असून त्यामुळे नागरिकांची कुचंबना होत आहे. दगडवाडी येथील नंदकिशोर मंदिर हे ...

Poor condition of toilets near Nandkishore temple | नंदकिशोर मंदिराजवळीस स्वच्छतागृहाची दुरवस्था

नंदकिशोर मंदिराजवळीस स्वच्छतागृहाची दुरवस्था

श्रध्दास्थान असलेल्या नंदकिशोर मंदिराजवळील स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली असून त्यामुळे नागरिकांची कुचंबना होत आहे.

दगडवाडी येथील नंदकिशोर मंदिर हे निमसाखर, निरवांगी, वालचंदनगर, कळंब या परिसरासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या कोरोना संक्रमणाच्या प्रादूर्भावामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दी नाही त्यामुळे मंदिर परिसरातील व स्वच्छतागृहाकडे दुर्लक्ष होत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या स्वच्छतागृहा मध्ये गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे पाणी गेले होते. त्यानंतर पुन्हा त्याची स्वच्छता झालीच नाही.

नंदकिशोर मंदिर नदी लगतच आहे. स्वच्छतागृह देखील त्यावेळी पाण्यात गेले होते. त्यामुळे त्यामध्ये माती चिखलाचा लगदा साठला आहे तसेच या स्वच्छतागृहाला काटेरी झुडपांनी वेढलेले आहे. त्यामुळे सदरील स्वच्छतागृहाची साफसफाई करुन ते सुस्थितीत आणावे अशी मागणी या परीसरातील ग्रामस्थ व भाविकांन मधून करण्यात येत आहे.

Web Title: Poor condition of toilets near Nandkishore temple