शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांची खराब स्थिती, पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था; इंदापूर बसस्थानकाच्या अस्वच्छतेवर परिवहन मंत्र्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:55 IST

पुढील भेटीत परिस्थिती बदललेली दिसली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट व कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा सरनाईक यांनी दिला

इंदापूर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ( दि.३०) अचानक इंदापूर एस.टी.बसस्थानकास भेट दिली. स्थानकावरील अस्वच्छता व प्रवाशांची गैरसोय पाहिल्यानंतर आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुखांना फैलावर घेत, परिस्थिती बदल झाला नाही तर थेट व कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला.    धाराशिवकडे जात असताना इंदापूर येथे थांबून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानकच बसस्थानकाची बारकाईने पाहणी केली. या पाहणीत शौचालयांची अत्यंत खराब स्थिती, पिण्याच्या पाण्याची अपुरी व अस्वच्छ व्यवस्था, हिरकणी कक्षातील निष्काळजीपणा, चौकशी कक्षातील तुटलेली काच, व्यापारी गाळ्यांची अतिक्रमणे निदर्शनास आल्यानंतर ते संतप्त झाले. या भेटीत प्रवाशांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.    यावेळी उपस्थित असणाऱ्या आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी व स्थानक प्रमुख संजय वायदंडे यांना 'बसस्थानक म्हणजे प्रवाशांसाठीचे पहिले सेवा केंद्र आहे. येथेच अशी घाण दिसत असेल, तर प्रशासन नेमकं काय करते आहे असा जाब विचारला. बसस्थानकाच्या परिसराची तात्काळ स्वच्छता करावी. संपूर्ण व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावेत असा आदेश दिला. पुढील भेटीत परिस्थिती बदललेली दिसली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट व कडक कारवाई केली जाईल',असा सज्जड इशारा ही त्यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Sarnaik Angered by Indapur Bus Stand's Poor Conditions.

Web Summary : Transport Minister Pratap Sarnaik, during a surprise visit, expressed anger at the Indapur bus stand's poor sanitation, inadequate drinking water, and overall mismanagement. He warned officials of strict action if improvements aren't made.
टॅग्स :Puneपुणेpassengerप्रवासीBus Driverबसचालकpratap sarnaikप्रताप सरनाईकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSocialसामाजिक