शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचे राजकारण तापले : पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 6:03 PM

कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीला राजकीय वळण मिळाले असून त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले.

पुणे : कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीला राजकीय वळण मिळाले असून त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. भाजप आमदारावर गुन्हा दाखल केल्यामुळे गायकवाड यांची बदली केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.                याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या साथीदारांवर ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा राग धरून सरकारने त्यांची बदली केल्याचा आरोप मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे गायकवाड यांची बदली विनंतीनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयाचे राजकारण करू नये असे आवाहन पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी केले आहे.मात्र त्यालाही दाद न देता हे प्रकरण वाढताना दिसत आहे.

पुणेकर म्हणतायेत ''अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड''

              यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, भाजप आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची केलेली बदली म्हणजे मुख्यमंत्र्याचा पोलिसांच्या कार्यपध्दतीवर विश्वास राहिलेला नाही किंवा त्यांची या प्रकाराला मुक संमती आहे, खंडणीखोरांना व गुन्हेगारांना पाठिशी घालतात, अशी पुणेकरांची भावना आहे. काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, अभय छाजेड, बापू पठारे, माजी महापौर प्रशांत जगताप, राकेश कामठे,  नंदा लोणकर, वनराज आंदेकर, भैय्यासाहेब जाधव आदी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिसTransferबदलीPoliticsराजकारण