पुणेकर म्हणतायेत ''अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड''

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 05:50 PM2018-10-20T17:50:05+5:302018-10-20T17:51:07+5:30

साेशल मिडीयावर अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड हा हॅशटॅग वापरुन काेंढवा पाेलीस स्टेशनचे माजी पाेलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांना समर्थन दर्शवण्यात येत अाहे.

punekar supporting pi milind gaikwad on social media | पुणेकर म्हणतायेत ''अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड''

पुणेकर म्हणतायेत ''अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड''

पुणे : भारतीय जनता पार्टीचे अामदार याेगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला म्हणून काेंढवा पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली केल्याची टीका विराेधी पक्षांकडून केली जात असताना अाता साेशल मिडीयावरही पुणेकर गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहत अाहेत. साेशल मिडीयावर अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड हा हॅशटॅग व्हायरल हाेत असून अनेक लाेक गायकवाड यांचे फाेटाे टाकून त्यांना पाठींबा देत अाहेत. 

    काेंढवा पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची नुकताच तडकाफडकी बदली करण्यात अाली. त्यांच्या बदलीमुळे कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. याचा व्हिडीअाे साेशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला हाेता. हडपसरचे भाजप अामदार याेगेश टिळेकर यांच्यावर काेंढवा पाेलीस ठाण्यात 50 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाल्याने गायकवाड यांची बदली केल्याचे बाेलले जात अाहे. त्यामुळे अापले कार्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या अधिकाऱ्याची राजकीय ताकद वापरुन बदली केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने गायकवाडांच्या समर्थनार्थ साेशल मिडीयावर पाेस्ट टाकल्या जात अाहेत. त्याचबराेबर विराेधी पक्षांनी देखील गायकवाड यांच्य बदलीचा निषेध करुन अांदाेलने केली अाहेत. सध्या फेसबुकवर अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड हा हॅशटॅग वापरुन गायकवाड यांना समर्थन दर्शवण्यात येत अाहे. 

     दरम्यान अनेक पाेलीस अधिकाऱ्यांनी मिलिंद गायकवाड यांचा फाेटाे व्हाॅट्स अॅप डिपी म्हणून ठेवला अाहे. अनेक अधिकारी अाणि कर्मचारी गायकवाड यांना पाठींबा दर्शवत अाहेत. 

काय अाहे प्रकरण 
हडपसरचे अामदार याेगेश टिळेकर यांच्यावर काेंढवा पाेलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. काेंढवा परिसरात अाॅप्टिक फायबरचं काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार फाेन करुन 50 लाखांची खंडणीची मागणी केल्याने कंपनीचे दक्षिण पुणे विभागाचे अधिकारी रवींद्र बराटे यांनी याेगेश टिळेकर अाणि त्यांचा भाऊ  त्यांचा भाऊ चेतन टिळेकर यांच्या विराेधात फिर्याद दाखल केली हाेती. साेबत माेबाईचे रेकाॅर्डिंग देण्यात अाले हाेते. या प्रकरणाचा महिनाभर सखाेल तपास केल्यानंतर याेगेश टिळेकर यांच्यावर काेंढवा पाेलीस स्टेशनमध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. 

कोंढव्यात पोलीस निरीक्षकांच्या बदली निषेधार्थ मनसेचा मूक मोर्चा

 

Web Title: punekar supporting pi milind gaikwad on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.