शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

विकासात तज्ज्ञांचा सहभाग की राजकीय सोय?

By admin | Updated: April 18, 2017 03:05 IST

शहाराच्या विकासामध्ये उच्च शिक्षित व तज्ज्ञ नागरिकांचा सहभाग वाढावा किंवा त्यांना किमान प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कायद्यानुसारच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ

पुणे : शहाराच्या विकासामध्ये उच्च शिक्षित व तज्ज्ञ नागरिकांचा सहभाग वाढावा किंवा त्यांना किमान प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कायद्यानुसारच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली जाते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कायद्यातून पळवाटा काढत राजकीय पक्षांच्या सोयीने स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाते. महापालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर तज्ज्ञ व्यक्तींना प्रतिनिधित्व मिळणार की पुन्हा राजकीय पक्षांची सोय पाहिली जाणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या कारभारामध्ये तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याचा फायदा होण्यासाठी कायद्यानुसारच डॉक्टर, निवृत्त मुख्याध्यापक, लेखापाल (सीए), अभियंता, वकील, निवृत्त महापालिका अधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्ता या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करणे अपेक्षित असते. यासाठी संबंधित व्यक्तींना किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून ५ व्यक्तींची महापालिका सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते. यामध्ये प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार ही संख्या निश्चित केली जाते. यासाठी संबंधित पक्षाची शिफारस बंधनकारक आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचे अधिकार पक्षाच्या शिफारशीवरच अबलंबून असतात. गेल्या काही वर्षांत स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताना सर्वच राजकीय पक्षांकडून आपली सोय पाहिली जाते. यामध्ये पक्षनेत्यांच्या जवळची व्यक्ती, तिकीट वाटप अथवा अन्य पद देताना नाराज झालेल्या कार्यकर्ता, पराभूत झालेला उमेदवार किंवा तोडपाणी करूनदेखील काही लोकांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केली जाते. यात प्रामुख्याने बहुतेक सर्व स्वीकृत नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते या एकाच प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश असतो. यामुळे मात्र महापालिकेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो.