मुख्य आरोपीच्या शोधात पोलिस यंत्रणा:पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:10 IST2021-03-21T04:10:35+5:302021-03-21T04:10:35+5:30

तीन आठवड्यापूर्वी खेड-शिवापूर टोल नाक्यावर ती बनावट टोल पावत्या चे रॅकेट उघडीस आले या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या शोधात पोलिस ...

Police in search of main accused: Patil | मुख्य आरोपीच्या शोधात पोलिस यंत्रणा:पाटील

मुख्य आरोपीच्या शोधात पोलिस यंत्रणा:पाटील

तीन आठवड्यापूर्वी खेड-शिवापूर टोल नाक्यावर ती बनावट टोल पावत्या चे रॅकेट उघडीस आले या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या शोधात पोलिस यंत्रणा आहे.

सुमारे तीन आठवड्यापूर्वी खेड शिवापूर टोल नाका व आनेवाडी टोल नाका या टोलनाक्यावरील बनावट टोल पावत्याचे रॅकेट उघडी स आले. या प्रकरणात आतापर्यंत अकरा जणांवर ती गुन्हे दाखल असून त्यातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.

या प्रकरणात आता पर्यन्त 70 जणांचे जबाब घेण्यात आले असून अजून ही अनेक टोल कर्मचाऱ्यांन चे व संबंधीत लोकांचे जबाब घेणे बाकि आहे. या प्रकरणी जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधातील गुन्ह्या शी निगडित सबळ पुरावे जमा केले जात असून या प्रकरणा संबंधित सर्व जणांचे जबाब घेतले जात आहेत. लवकरच मुख्य सुत्रधार पकडला जाईल, अशी माहिती भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी दिली.

बनावट टोल पावत्या प्रकरणाचा तपास अत्यंत योग्य पद्धतीने चालू असून येत्या काही दिवसात आम्ही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेरबंद करू या प्रकरणातील कोणीही दोषी आमच्या कारवाईतून सुटणार नाही

.

. धनंजय पाटील

भोर उपविभागीय पोलीस अधिकारी

Web Title: Police in search of main accused: Patil