क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यांकडून पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:09 IST2021-04-19T04:09:57+5:302021-04-19T04:09:57+5:30

पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन माध्यमातून सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांना अटक केली ...

Police beaten by cricket bettors | क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यांकडून पोलिसांना मारहाण

क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यांकडून पोलिसांना मारहाण

पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन माध्यमातून सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. आकुर्डी येथे शुक्रवारी (दि. १६) रात्री ही घटना घडली.

श्रीपाद मोहन यादव (वय २२, रा. पंचतारानगर, आकुर्डी), अमित रामपाल अगरवाल (वय ३५, रा. निगडी), नितीश रामदास काळे (वय २१, रा. पंचतारानगर, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह किशोर रेहाल उर्फ किशोर भाई (रा. चेंबूर, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक विजय तेलेवार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या संघांदरम्यानच्या सामन्यावर आरोपी हे लोटस ऑनलाइन सट्टा हा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आकुर्डी परिसरात सापळा लावून कारवाई केली. आरोपी ऑनलाइन सट्टा घेत असताना मिळून आले. त्यामुळे आरोपींवर कारवाई केली. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करत गडबड, गोंधळ आणि दहशत केली. पोलिसांना मारहाण केली. पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला.

Web Title: Police beaten by cricket bettors