पिंपरी : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या नकाशावर पुण्याचे स्थान अधिक भक्कम करणारी ‘पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर’ ही सायकलिंग स्पर्धा पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात पार पडत आहे. स्पर्धेच्या आयोजनात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका आर्थिक आधार देणारी ठरली आहे.
स्पर्धेसाठी ‘पीएमआरडीए’ने १९४.८८ कोटींचा निधी देत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. स्पर्धेत ४० ते ५० देशांतील ऑलिम्पिक स्तरावरील खेळाडू सहभागी झाले असून, त्यामुळे पुणे व महाराष्ट्रासह भारताचे क्रीडा, पर्यटन आणि सांस्कृतिक सामर्थ्य जागतिक पातळीवर अधिक ठळकपणे अधोरेखित झाले आहे.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मानकांनुसार ‘पीएमआरडीए’ हद्दीतील स्पर्धा मार्गावरील रस्त्यांच्या विकासासाठी निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. त्यात मुळशी-मावळ, भोर, वेल्हे, पुरंदर, हवेली तसेच पुरंदर-बारामती तालुक्यांतील ‘पीएमआरडीए’ कार्यक्षेत्रातील १६७.४९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर आंतरराष्ट्रीय स्पर्धेस अनुरूप कामे केली आहेत. यामध्ये रस्ते व पूल दुरुस्ती, मजबुतीकरण, रंगरंगोटी, दिशादर्शक व माहिती फलक, रस्ते स्वच्छता तसेच सुरक्षिततेशी संबंधित पूरक कामांचा समावेश आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १७ महत्त्वाची कामे पूर्ण केली असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात ४८.७२ कोटी रुपये वर्ग केले आहेत. ‘पीएमआरडीए’च्या आर्थिक सहकार्यामुळे ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय निकषांनुसार पार पडत आहे. स्पर्धेमुळे पुणे महानगर प्रदेशातील ग्रामीण व दुर्गम भाग जागतिक स्तरावर प्रकाशझोतात येत आहे. पुण्याने आता जागतिक क्रीडा आयोजनासाठी सक्षम महानगर प्रदेश अशी नवी ओळख निर्माण केली आहे.
Web Summary : PMRDA funds Pune Grand Challenge Tour 2026 with ₹194.88 crores, boosting infrastructure for the international cycling event. The competition, with participants from 40-50 countries, enhances Pune's global sports profile, supported by road upgrades across multiple talukas.
Web Summary : पीएमआरडीए ने पुणे ग्रैंड चैलेंज टूर 2026 को ₹194.88 करोड़ का फंड दिया, जिससे अंतरराष्ट्रीय साइकिलिंग कार्यक्रम के लिए बुनियादी ढांचे को बढ़ावा मिला। 40-50 देशों के प्रतिभागियों के साथ प्रतियोगिता, कई तालुकाओं में सड़क उन्नयन द्वारा समर्थित पुणे की वैश्विक खेल प्रोफ़ाइल को बढ़ाती है।