शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:08 IST

PMC Result 2026 Rupali Thombre Patil news :

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीचे निकाल हाती येत असतानाच न्यू इंग्लिश स्कूल मतमोजणी केंद्रावर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणी प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा दावा करत केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. "लोकशाहीची हत्या झाली आहे," असे म्हणत त्यांनी मतमोजणीवर बहिष्कार टाकला आहे.

रूपाली ठोंबरे यांनी आरोप केला आहे की, "मतदानादिवशी वापरलेल्या ईव्हीएम मशीन आणि आज मतमोजणीसाठी आणलेल्या मशीनच्या क्रमांकात तफावत आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक मशीन बदलल्या आहेत." केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांशी त्यांची जोरदार हुज्जत झाली. इतर काही अपक्ष उमेदवारांनीही रूपाली ठोंबरे यांच्या सुरात सूर मिसळत मोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर संतापलेल्या रुपाली यांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. 

घोषणाबाजी आणि राडाकेंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जादा कुमक बोलवावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार रूपाली पाटील ठोंबरे यांनी मतदान यंत्रांवर (EVM) घेतलेल्या आक्षेपामुळे सुमारे दोन तास मतमोजणी थांबवण्यात आली होती. काही मतदान यंत्रांचे सील आणि क्रमांक यामध्ये तफावत आहे, असा आक्षेप ठोंबरे यांनी घेतला होता.  

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, सर्व मशीन सीलबंद आणि नियमानुसार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, रूपाली ठोंबरे यांनी पुराव्यासह तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. अखेर मतमोजणी पुन्हा सुरू होताच समोर आलेल्या कलांनुसार, प्रभाग २५ मधून भारतीय जनता पक्षाचे (BJP) सर्व उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Election: EVM Tampering Allegations Halt Counting; Rupali Thombre Protests

Web Summary : Rupali Thombre alleged EVM discrepancies halted Pune's vote counting. She claimed machines were switched, leading to protests and attempts to enter the strongroom. BJP candidates are leading.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपा