शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: 'अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय', महेश लांडगेंच्या विधानावर अजित पवारांची मिश्किल टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:20 IST

PMC Election 2026 अरे तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्यांनी छोट्या नेत्याला एकेरीचं बोलायचं असतं, आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाशी तसं बोलतो ना '

पुणे : पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीवरून महायुती सरकारमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळत आहे. इथे प्रचारसभेतून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करू लागले आहेत. अजित पवारांनी पिंपरीतील आमदार, सत्ताधारी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांविरोधात थेट दंड थोपाटले आहेत. 

अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी एका आमदारावर टीका केली होती. मी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. तू कसा आमदार होतो, तेच बघतो. असं ते म्हणाले होते. याचा आधार घेत आमदार महेश लांडगे यांनी जोरदार हल्लाबोल केला. आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी जर ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो, तर आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अरे आमच्या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत. याच तुझा कार्यक्रम करतील. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या! अशी टीका महेश लांडगे यांनी केली होती. 

महेश लांडगे यांनी एकेरी उल्लेख करत अजित पवारांवर टीका केली. त्याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता त्यांनी मिश्किल टिपण्णी करत उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, अरे तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्यांनी छोट्या नेत्याला एकेरीचं बोलायचं असतं. तुला माहिती नाही. आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला 'अहो या बसा पाणी आणून देता का हो? असं नाही. हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय असं अजित पवार म्हणाले आहेत. 

रोहित पवारांनीही घेतला होता समाचार
 
त्या विधानावर पुण्यात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले असताना रोहित पवारांनी पलटवार केला आहे.  रोहित पवार म्हणाले, बांगड्या भरल्या असे म्हणणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. त्यांचा खरा चेहरा हळूहळू समोर येत आहे. ते थोडे घाबरलेले आहेत. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल अशी टीका पवार यांनी त्यांच्यावर केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pawar dismisses Landge's criticism as trivial amid PMC election heat.

Web Summary : Amidst PMC election rivalry, Mahesh Landge criticized Ajit Pawar, who downplayed it, citing Landge's senior status. Rohit Pawar condemned Landge's remarks as disrespectful to women, revealing his insecurity.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारPMPMLपीएमपीएमएलmahesh landgeमहेश लांडगेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा